Astral Share Price : ॲस्ट्रल (शुक्रवारचा बंद भाव : रु. १८४२)

देशात सीपीव्हीसी पाइप प्रणाली सुरू करणारी पहिली कंपनी असलेली ॲस्ट्रल लि. आज या क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे.
share market Astral Share Price Astral stock analysis Friday closing price Rs 1842 marathi news
share market Astral Share Price Astral stock analysis Friday closing price Rs 1842 marathi newsSakal
Updated on

देशात सीपीव्हीसी पाइप प्रणाली सुरू करणारी पहिली कंपनी असलेली ॲस्ट्रल लि. आज या क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे. देशात २००४ मध्ये लीड-फ्री पीव्हीसी पाइप; तसेच २०१२ मध्ये लीड-फ्री यूपीव्हीसी कॉलम पाइप प्रणाली सुरू करणारीदेखील ही पहिली कंपनी आहे. देशातील बाजारपेठेतील नऊ टक्के हिस्सा या कंपनीकडे आहे.

आता कंपनी ॲडेसिव्ह व पेंट व्यवसायातही विस्तार करत आहे. या कंपनीची स्थापना रासायनिक अभियंता असलेले संदीप इंजिनिअर यांनी १९९६ मध्ये केली. ते या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांना तीन दशकांहून अधिक काळ व्यवसायाचा अनुभव आहे. आता त्यांची पुढची पिढी या उद्योगाची धुरा सांभाळत आहे.

कंपनीने अलीकडेच जाहीर केलेल्या तिमाही निकालानुसार, कंपनीने १३२ कोटी नफा कमविला आहे. कंपनीच्या ओडिशातील कारखान्याने उत्पादनात सातत्याने वाढ केली आहे, तर अलीकडेच कंपनीने गुवाहाटी येथेही व्यावसायिक उत्पादन सुरू केले आहे.

कंपनीच्या दहेज येथील अॅडेसिव्ह प्रकल्पातदेखील व्यावसायिक उत्पादन सुरू केले आहे. अलीकडे कंपनीच्या ‘फायर प्रो’ या देशातील पहिल्या स्वयंचलित फायर स्प्रिंकलर सिस्टिम ‘आयएसआय प्रमाणपत्र’ मिळाले आहे. तिमाही दरम्यान, कंपनीला वॉटर टँक उत्पादनांसाठी ‘एनएसएफ’चे (नॅशनल सॅनिटेशन फाउंडेशन) प्रमाणपत्र मिळाले आहे. पाण्याच्या टाक्यांच्या उत्पादनांसाठी ‘एनएसएफ’ प्रमाणित हा पहिला ब्रँड आहे.

सिंचन, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यासारख्या क्षेत्रातील गुंतवणूक वाढल्यामुळे प्लॅस्टिक पाइपच्या उद्योगाच्या वाढीचा वेग देशाच्या ‘जीडीपी’ अर्थात ‘एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या वेगापेक्षा अधिक आहे.

धातूच्या पाइपऐवजी प्लॅस्टिक पाइपचा वापर वाढल्यामुळे व्यवसायवाढीला मदत मिळत आहे. बांधकाम क्षेत्रामधील विकास, पायाभूत सुविधांमधील विकास; तसेच तेल आणि वायू वाहतूक यांसारख्या उद्योगधंद्यांमुळे आगामी काळात प्लॅस्टिक पाइपची मागणी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

कर्जाचे प्रमाण कमी ठेवून व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर सातत्याने २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत कंपनीने विक्री; तसेच नफ्यामध्ये गेल्या १० वर्षांत प्रतिवर्ष १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ केली आहे. नफ्याची धंद्यात पुन्हा गुंतवणूक करून कंपनी व्यवसायवृद्धी करत आहे. शेअर बाजारातील चढ-उतार आणि कंपनीच्या कार्यक्षेत्रातील धोका लक्षात घेऊन या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घावधीच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.