Share Market Closing: ऐतिहासिक घसरणीनंतर बाजाराने मोडला तेजीचा विक्रम; सेन्सेक्सने गाठली नवीन उंची

Share Market Closing: व्यापार सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात जबरदस्त वाढ झाली. मंगळवारी झालेली घसरण बाजाराने कव्हर केली आहे. सेन्सेक्सनेही आज उच्चांक गाठला आहे. सकाळी सेन्सेक्स-निफ्टी किंचित घसरणीसह उघडले. मात्र त्यानंतर बाजारात तेजीची नोंद होऊ लागली.
Share Market Today
Share Market Sensex, Nifty end at fresh all-time highsSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 7 June 2024: बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर तेजी परतली आहे. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्सने मागील सर्व विक्रम मोडीत काढले आणि नवीन सार्वकालिक उच्चांक गाठला. सेन्सेक्सने एकाच दिवसात 1,700 अंकांची वाढ नोंदवली असून तो 76,794.06 अंकांवर पोहोचला आहे. त्यामुळे निवडणूक निकालाच्या दिवशी म्हणजे 4 जून रोजी शेअर बाजारातील घसरण पूर्णपणे सावरली आहे.

आज शुक्रवारी देशात नवीन सरकार स्थापनेची अधिकृत सुरुवात झाली. सकाळी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने द्वि-मासिक चलन धोरण जाहीर केले. यावेळीही रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही आणि देशातील महागाई कमी करण्यावर आरबीआयचे लक्ष आहे. या दोन्ही घटनांमुळे सकाळपासून बाजारात तेजीचे वातावरण कायम होते.

Share Market Closing
Share Market TodaySakal

सेन्सेक्सनेही आज उच्चांक गाठला आणि निफ्टीही 2% वाढीसह बंद झाला. सलग तिसऱ्या दिवशी बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्सने 76,794 चा नवा विक्रम केला. सेन्सेक्स 1,700 अंकांनी वाढून 76,794 वर बंद झाला. निफ्टी 468 अंकांनी वाढून 23,290 वर बंद झाला.

Share Market Today
JLL Report: देशात न विकल्या गेलेल्या घरांच्या संख्या 24 टक्क्यांनी वाढली; तरीही किमतीत घसरण नाहीच
Share Market Closing
Share Market TodaySakal

मार्केट कॅपमध्ये 7.50 लाख कोटी रुपयांची वाढ

आजच्या व्यापार सत्रात भारतीय शेअर बाजारातील जोरदार उसळीमुळे सलग तिसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. बीएसईवर कंपन्यांच्या शेअर्सचे मार्केट कॅप 423.56 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 415.89 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 7.67 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Share Market Closing
BSE SENSEXSakal

RBIच्या GDP वाढीच्या अंदाजाचा शेअर बाजारावर परिणाम

भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी पतधोरणाचा आढावा सादर केल्यानंतर शेअर बाजारात वाढ नोंदवण्यात आली. चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 7.2 टक्के राहण्याचा आरबीआयच्या अंदाजानंतर, शेअर बाजारात 1600 पर्यंत वाढ झाली होती.

Share Market Today
HDFC Bank: ग्राहकांसाठी मोठी बातमी! HDFC बँकेची ऑनलाइन सेवा 2 दिवस राहणार बंद; काय आहे कारण?

शुक्रवारी शेअर बाजारात आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. गौतम अदानी समूहाच्या 10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांचे शेअर्स तेजीत तर अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे ​​शेअर्स किंचित घसरणीसह बंद झाले.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या सत्रात सर्वच क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले. आयटी बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, कंझ्युमर ड्युरेबल्स, फार्मा, मेटल, ऊर्जा, आरोग्यसेवा, तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले.

बाजारात 3952 शेअर्सचे व्यवहार झाले ज्यात 2894 शेअर्स वाढीसह आणि 967 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 353 वरच्या सर्किटवर आणि 166 लोअर सर्किटवर बंद झाले. सेन्सेक्समधील सर्व 30 शेअर्स तेजीसह बंद झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()