Share Market Closing: दिवसभरातील चढ-उतारानंतर सेन्सेक्स निफ्टी घसरणीसह बंद; कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Closing Today: देशांतर्गत शेअर बाजार बुधवारी (9 ऑक्टोबर) दिवसभरातील चढ-उतारानंतर घ सरणीसह बंद झाला. पहिल्या सहामाहीत बाजाराने चांगली वाढ दर्शविली होती. सेन्सेक्स आणि निफ्टीनेही चांगला नफा कमावला होता.
Share Market Closing
Share Market ClosingSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 9 October 2024: देशांतर्गत शेअर बाजार बुधवारी (9 ऑक्टोबर) दिवसभरातील चढ-उतारानंतर घसरणीसह बंद झाला. पहिल्या सहामाहीत बाजाराने चांगली वाढ दर्शविली होती. सेन्सेक्स आणि निफ्टीनेही चांगला नफा कमावला होता. पण त्यानंतर दुसऱ्या सहामाहीत बाजार अचानक घसरला.

दिवसभर प्रचंड चढ-उतार असताना सर्व नफा गमावल्यानंतर बाजार घसरणीवर बंद झाला. निफ्टी 31 अंकांनी घसरला आणि 24,981 वर बंद झाला. सेन्सेक्स 167 अंकांनी घसरून 81,467 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 14 अंकांनी घसरून 51,007 वर बंद झाला.

Share Market Today
Share Market ClosingSakal

RBI MPC ने सलग 10 व्यांदा रेपो रेट 6.5% वर स्थिर ठेवल्यानंतर, बाजारात चांगली वाढ दिसून आली. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, चलनविषयक समितीने रेपो दर 6.5% वर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासह समितीने आर्थिक धोरणावर आपली भूमिका तटस्थ ठेवली आहे.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात ऑटो, आयटी, फार्मा, रिअल इस्टेट, मीडिया, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्स या क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर एफएमसीजी, बँकिंग, ऊर्जा, तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स घसरले. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली.

Share Market Today
Share Market ClosingSakal
Share Market Closing
RBI MPC Meeting: गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी घेतला मोठा निर्णय; तुमचा EMI कमी झाला का?
कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 21 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 9 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 29 शेअर्स वाढीसह तर 21 शेअर्स घसरणीसह बंद झाले. वाढत्या शेअर्समध्ये टाटा मोटर्स 2.15 टक्के, टेक महिंद्रा 1.92 टक्के, मारुती सुझुकी 1.80 टक्के, एसबीआय 1.66 टक्के, बजाज फायनान्स 1.57 टक्के, ॲक्सिस बँक 1.50 टक्के, भारती एअरटेल 1.44 टक्के, फिनसर्व्ह 1.35 टक्के वाढीसह बंद झाले.

घसरलेल्या शेअर्समध्ये, आयटीसी 3.08 टक्के, नेस्ले 2.21 टक्के, रिलायन्स 1.65 टक्के, एचयूएल 1.47 टक्के, एल अँड टी 1.13 टक्के, इंडसइंड बँक 0.97 टक्के घसरून बंद झाले.

Share Market Today
BSE SENSEXSakal
Share Market Closing
US Jobs: अमेरिकेत 87 लाख लोक एकपेक्षा जास्त नोकऱ्या करत आहेत; देशात नेमकं काय घडतयं?
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3 लाख कोटींची वाढ

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण होऊनही भारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे. बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप 462.43 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 459.50 लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.