Share Market Closing Latest Update 4 December 2023:
शेअर बाजारात सोमवारी (4 डिसेंबर) विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयाचा बाजारावर जबरदस्त परिणाम झाला. बीएसई सेन्सेक्स 1383 अंकांनी वाढून 68,865 वर बंद झाला. निफ्टीनेही 20,700 चा विक्रमी उच्चांक गाठला.
मात्र, तो अखेर 418 अंकांनी वाढून 20,686 वर बंद झाला. व्यवहाराच्या सत्रात बाजारातील सर्वांगीण वाढीमुळे बँकिंग आणि रियल्टी क्षेत्रात सर्वाधिक खरेदी झाली.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँकमध्ये वाढ नोंदवली गेली आणि चांगली गोष्ट म्हणजे ही वाढ दिवसभर राहिली.
BSE वर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांचे बाजार भांडवल 4.09 लाख कोटी रुपयांनी वाढून 341.76 लाख कोटी रुपये झाले आहे. सुरुवातीच्या व्यवहारातच बाजाराने हा आकडा गाठला. आज ट्रेडिंगच्या पहिल्या 15 मिनिटांत 4 लाख कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक बाजारात आली.
क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती
आजच्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टीने ऐतिहासिक उच्चांक गाठला. त्यामुळे बँक निफ्टीनेही 1668 अंकांच्या उसळीसह 46,484 अंकांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. निफ्टी मिड कॅप इंडेक्स आणि स्मॉल इंडेक्स देखील त्यांच्या उच्चांकावर बंद झाले आहेत.
आजच्या व्यवहारात सरकारी आणि खाजगी दोन्ही बँकांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. सरकारी कंपन्यांमध्येही मोठी खरेदी झाली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 28 शेअर्स वाढीसह आणि 2 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 45 शेअर्स वाढीसह तर 5 शेअर्स घसरणीसह बंद झाले.
सेन्सेक्समध्ये फक्त 2 शेअर्स घसरले
सेन्सेक्सचे केवळ 2 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्ये विप्रोचे शेअर्स 0.10 टक्क्यांनी सर्वाधिक घसरले. टाटा मोटर्सचा शेअर 0.04% च्या किंचित घसरणीसह बंद झाला.
गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले
BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 4 डिसेंबर रोजी 343.45 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवारी 1 डिसेंबर रोजी 337.67 लाख कोटी रुपये होते.
अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 6 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 6 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.