Share Market Closing: 7 दिवसांच्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्स निफ्टी घसरणीसह बंद, कोणते शेअर्स चमकले?

Share Market Closing: सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांनी खाली
Share Market Closing latest updates in marathi Sensex down 100 pts, Nifty above 20,900; FMCG shares weigh on D-Street 7 december 2023
Share Market Closing latest updates in marathi Sensex down 100 pts, Nifty above 20,900; FMCG shares weigh on D-Street 7 december 2023 Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 7 December 2023: आठवड्यातील चौथ्या व्यापार सत्रात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 117 अंकांच्या घसरणीसह 69600 च्या खाली बंद झाला. याशिवाय निफ्टी 50 निर्देशांकात 25 अंकांची किंचित घसरण नोंदवली गेली आणि हा निर्देशांक 20900 च्या जवळपास बंद झाला.

शेअर बाजारातील सर्वाधिक तेजी असलेल्या शेअर्समध्ये अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट आणि सिप्ला या कंपन्यांचे शेअर्स होते. तर रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सिस बँक, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, इन्फोसिस आणि अश्निषा इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजीचा कल होता, ज्यामुळे गुंतवणूकदारांनी आजही शेअर बाजारात सुमारे 1.32 लाख कोटी रुपयांचा नफा कमावला. युटिलिटी, पॉवर, सर्व्हिसेस आणि कंझ्युमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये वाढ दिसून आली.

Share Market Closing latest updates in marathi Sensex down 100 pts, Nifty above 20,900; FMCG shares weigh on D-Street 7 december 2023
Paytm Share: एक निर्णय अन् पेटीएमच्या शेअर्समध्ये 20 टक्के घसरण, गुंतवणूकदार चिंतेत

सेन्सेक्समध्ये कोणते शेअर्स वाढले?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 13 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.47 टक्के वाढ झाली. तर अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, आयटीसी आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्समध्ये कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्समधील उर्वरित 17 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही भारती एअरटेलचे शेअर्स 2.34 टक्क्यांसह सर्वाधिक घसरले. तर हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL), टाटा स्टील, ITC आणि ICICI बँक यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing latest updates in marathi Sensex down 100 pts, Nifty above 20,900; FMCG shares weigh on D-Street 7 december 2023
Gautam Adani: गौतम अदानींनी कमाईच्या बाबतीत मस्कलाही टाकले मागे, 24 तासात कमावले 1,91,62,33,50,000 रुपये

गुंतवणूकदारांनी 1.32 लाख कोटी कमावले

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 7 डिसेंबर रोजी 350.17 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे बुधवारी 6 डिसेंबर रोजी 348.85 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.32 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.32 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.