Share Market
Share Market Sakal

Share Market Closing: शेअर बाजारात सलग 8 व्या दिवशी तेजी; सेन्सेक्स 67,221 वर बंद, कोणत्या शेअर्सनी केले मालामाल?

Share Market Closing: गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.53 लाख कोटींची घसरण झाली
Published on

Share Market Closing Latest Update 12 September 2023: मंगळवारी शेअर बाजार विक्रमी पातळीवर उघडला, पण काही मिनिटांतच बाजारात घसरण झाली. BSE सेन्सेक्स इंट्राडे हाय 67,539 वरून 67,000 च्या खाली घसरला आहे. याचा अर्थ निर्देशांक वरच्या पातळीपासून सुमारे 550 अंकांनी घसरला. 20,110 चा विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर निफ्टीनेही 19,900 चा स्तर गाठला होता.

कोणत्या क्षेत्रांवर दबाव होता?

PSU बँकिंग, मेटल आणि रियल्टी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे शेअर बाजारात दबाव होता. निफ्टीमध्ये, अदानी एंटरप्रायझेस, बीपीसीएल, अदानी पोर्टचे शेअर्स प्रत्येकी 3% च्या घसरणीसह टॉप लूसर होते.

Share Market Closing 12 September 2023 (S&P BSE SENSEX)
Share Market Closing 12 September 2023 (S&P BSE SENSEX)Sakal
Share Market
Nitin Gadkari: डिझेल कार घेणे होणार महाग, 10 टक्के जीएसटी लावण्याचा नितीन गडकरींचा प्रस्ताव

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्समधील 30 पैकी 15 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्ये देखील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.75% वाढ झाली आहे. लार्सन अँड टुब्रो (L&T), इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट आणि ICICI बँक यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सेन्सेक्सचे उर्वरित 15 शेअर्स घसरणीसह बंद झाले. त्यापैकी एनटीपीसीचे शेअर्स सर्वाधिक 3.48 टक्क्यांनी घसरले. याशिवाय पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

Share Market
10% GST On Diesel Cars: कंपन्यांचे शेअर्स घसरताच नितीन गडकरींचा यू-टर्न! म्हणाले...

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.53 लाख कोटींची घसरण झाली

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 12 सप्टेंबर रोजी घसरुन 318.73 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे आधीच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजे 7 सप्टेंबर रोजी 324.26 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 5.53 लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. किंवा दुसऱ्या शब्दात, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 5.53 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.