Share Market Closing: शेअर बाजारातील तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 67,600 च्या खाली बंद, कोणते शेअर्स घसरले?

Share Market Closing: गणेश चतुर्थीनिमित्त मंगळवारी शेअर बाजार बंद राहणार आहे.
Share Market update
Share Market updateSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 18 September 2023: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 241 अंकांनी घसरून 67,596 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीही 59 अंकांनी घसरून 20,133 वर पोहोचला. गणेश चतुर्थीनिमित्त मंगळवारी शेअर बाजार बंद राहणार आहे.

कोणत्या क्षेत्रांवर दबाव होता?

आज मेटल, रिअॅल्टी आणि बँकिंग शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे शेअर बाजारात दबाव होता. एचडीएफसी बँकेचे शेअर्स 1.25 टक्क्यांनी घसरले. हिंदाल्कोचा शेअर 2% घसरणीसह बंद झाला. पॉवरग्रिड शेअर्स 3% वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

आज पीएसयू बँकांमध्ये 3.5 टक्क्यांची वाढ दिसून आली. त्याचप्रमाणे पॉवर इंडेक्समध्ये एक टक्के, ऑटो इंडेक्समध्ये एक टक्के आणि एफएमसीजीमध्ये 0.5 टक्के वाढ दिसून आली.

बँक, आयटी, फार्मा आणि मेटल निर्देशांकात 0.5-0.5 टक्क्यांची घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप निर्देशांकात 0.3 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांकात 0.5 टक्क्यांची घसरण दिसून आली.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

बीएसई सेन्सेक्सवर, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, इन्फोसिस, टाटा स्टील आणि अल्टाट्रॅक सिमेंटच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली. याशिवाय कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, अॅक्सिस बँक, मारुती आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market update
Mumbai News: मुंबईत स्वस्तात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, किंमत फक्त 9 लाख, असा करा अर्ज

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

बीएसई सेन्सेक्सवर पॉवरग्रिड, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, नेस्ले इंडिया, आयटीसी, एबीआय, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स आणि लार्सन अँड टुब्रो यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले.

Share Market update
China Economy: शेअर बाजार उघडताच चीनवर मोठे आर्थिक संकट, 5 मिनिटांत कंपनीचे 2,200 कोटी रुपयांचे नुकसान

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 50 हजार कोटींचे नुकसान झाले

शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती कमी झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 322. 90 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या सत्रात 323.40 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 50 हजार कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.