Share Market Closing Latest Update 4 September 2023: सेन्सेक्स 65,628 वर बंद. सोमवारी (4 सप्टेंबर) शेअर बाजारात सकारात्मक व्यवहार दिसून आला. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 240 अंकांनी वाढून 65,628 वर बंद झाला.
निफ्टीही 102 अंकांनी वाढून 19,537 वर बंद झाला. बाजारातील तेजीमध्ये मेटल, आयटी आणि पीएसयू बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली.
क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती
आज सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीसह बंद झाले. पॉवर, मेटल, ऑटो, रिअल इस्टेट, ऑइल अँड गॅस आणि पीएसयू बँक शेअर्समध्ये वाढीसह बंद झाले. त्याच वेळी बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही प्रत्येकी एक टक्क्यांची वाढ दिसून आली.
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 15 शेअर्स वाढीसह आणि 15 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 31 शेअर्स वाढीसह आणि 19 शेअर्स घसरणीसह बंद झाले.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी
बीएसई सेन्सेक्सवर विप्रोचे शेअर 4.34 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. त्याचप्रमाणे एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, टेक महिंद्रा, एनटीपीसी, इन्फोसिस, पॉवरग्रिड, टीसीएस आणि एसबीआयचे शेअर्स एक टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले.
याशिवाय एचडीएफसी बँक, जेएसडब्ल्यू स्टील, लार्सन अँड टुब्रो, मारुती आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स तेजीसह बंद झाले.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:
महिंद्रा आणि महिंद्राचा शेअर सेन्सेक्सवर सर्वाधिक 0.97 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. याशिवाय अॅक्सिस बँक, आयटीसी, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक, टायटन, टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह आणि आयसीआयसीआय बँक यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.74 लाख कोटी रुपयांची वाढ
शेअर बाजारातील चौफेर खरेदीतून गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 315.15 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे, जे मागील ट्रेडिंग सत्रात 312.41 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.74 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.