Share Market Closing: सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला; सेन्सेक्स 247 अंकांनी खाली, कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक विक्री?

Share Market Closing: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीची नोंद झाली.
Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today Bajaj Auto jumps 6 percent; LTIMindtree surges 5 percent 19 October 2023
Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today Bajaj Auto jumps 6 percent; LTIMindtree surges 5 percent 19 October 2023 Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 19 October 2023:

गुरुवारी (19 ऑक्टोबर) सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीची नोंद झाली. कमकुवत जागतिक संकेतांमुळे प्रमुख बाजार निर्देशांक घसरणीसह झाले. BSE सेन्सेक्स 247 अंकांनी घसरून 65,629 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीही 46 अंकांनी घसरून 19,624 वर आला. धातू, बँकिंग आणि फार्मा क्षेत्रात सर्वाधिक विक्री नोंदवली गेली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, फार्मा, मेटल, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, हेल्थकेअर, तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर कंझ्युमर ड्युरेबल्स, मीडिया, एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले.

आजच्या व्यवहारात मिड कॅप शेअर्समध्ये घसरण झाली तर स्मॉल कॅप इंडेक्स तेजीसह बंद झाला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 8 शेअर्स वाढीसह आणि 22 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 17 शेअर्स वाढीसह आणि 33 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today Bajaj Auto jumps 6 percent; LTIMindtree surges 5 percent 19 October 2023
Israel Hamas War: इस्राइल हमास युद्धामुळे जगातील सर्वात मोठ्या कंपनीने इस्राइलमधील व्यवसाय बंद केला

गुंतवणूकदारांचे नुकसान

आजही बाजारातील घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 320.91 लाख कोटी रुपयांवर आले आहे, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 321.39 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे 48,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today Bajaj Auto jumps 6 percent; LTIMindtree surges 5 percent 19 October 2023
GST Evasion: 1.36 लाख कोटी रुपयांची जीएसटी चोरी उघड, 500 जणांना अटक, काय आहे प्रकरण?

बुधवारी अमेरिकन बाजार घसरणीसह बंद झाले, तर गुरुवारी सोल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँगमधील आशियाई बाजार नकारात्मक व्यवहार करत होते. या नकारात्मक ट्रेंडचा परिणाम भारतीय शेअर बाजारातील घसरणीच्या रूपात दिसून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.