मध्यपूर्वेतील वाढता तणाव, यूएस बॉण्ड उत्पन्नात वाढ आणि प्रमुख कंपन्यांसाठी अपेक्षेपेक्षा कमी तिमाही निकाल यामुळे आज सलग पाचव्या दिवशी बाजारात विक्री झाली. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 आज इंट्रा-डेमध्ये एक टक्क्यांहून अधिक घसरले.
बुधवारी (25ऑक्टोबर) रोजी सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. कमकुवत जागतिक संकेतांमुळे प्रमुख बाजार निर्देशांक घसरले. BSE सेन्सेक्स 522 अंकांनी घसरला आणि 64,049 वर बंद झाला. निफ्टीही 159 अंकांनी घसरून 19,122 वर आला.
बाजारातील घसरणीत आयटी, वित्तीय आणि फार्मा क्षेत्र आघाडीवर होते. निफ्टीचा टॉप लूसर अपोलो हॉस्पिटलचा शेअर होता, जो 2.4% खाली घसरला. याआधी सोमवारी भारतीय बाजारात सलग चौथ्या दिवशी विक्रीची नोंद झाली. BSE सेन्सेक्स 825 अंकांनी घसरून 64,571 वर बंद झाला.
सलग 5 व्या दिवशी शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना सुमारे 15 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 309.32 लाख कोटी रुपयांवर घसरले, जे 17 ऑक्टोबर रोजी बाजार बंद झाल्यानंतर 323.87 लाख कोटी रुपये होते.
सेन्सेक्सवर 30 शेअर्सची नोंद आहे, त्यापैकी फक्त 6 शेअर्स आज तेजीसह बंद झाले. यामध्येही आज सर्वात मोठी वाढ टाटा स्टील, एसबीआय आणि एमअँडएममध्ये झाली. दुसरीकडे, इन्फोसिस, भारती एअरटेल आणि एनटीपीसी यांच्या शेअर्समध्ये आज सर्वाधिक घसरण झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.