Share Market Closing: शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 300 हून अधिक अंकांनी घसरला; बँक निफ्टीची काय स्थिती?

Share Market Closing: आठवड्याच्या पहिल्या व्यापार सत्रात भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला.
Share Market
Share MarketEsakal
Updated on

Share Market Closing Latest Update 3 October 2023:

आठवड्याच्या पहिल्या व्यापार सत्रात भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. मात्र, बाजाराची सुरुवातही घसरणीसह झाली होती. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही बाजार निर्देशांकांमध्ये जवळपास अर्धा टक्का घसरण झाली आहे.

आजच्या व्यापार सत्रात सेन्सेक्स 316.31 अंकांनी किंवा 0.48 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. निफ्टी 50 निर्देशांक 109.50 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. आजच्या ट्रेडिंग सत्रात 1816 शेअर्समध्ये खरेदी तर 1817 शेअर्समध्ये विक्री झाली.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

आजच्या व्यवहारात ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. याशिवाय ऑटो, बँकिंग, फार्मा, एफएनसीजी, मेटल, हेल्थकेअर, तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्सही घसरणीसह बंद झाले.

मात्र, रिअल इस्टेट आणि सरकारी बँकांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समधील खरेदीमुळे मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 11 शेअर्स वाढीसह आणि 19 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 13 शेअर्स वाढीसह आणि 37 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing 3 October 2023 (S&P BSE SENSEX)
Share Market Closing 3 October 2023 (S&P BSE SENSEX)Sakal

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये वाढ

सेन्सेक्समध्ये आज बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये सर्वाधिक 2.06% वाढ झाली आहे. यानंतर लार्सन अँड टुब्रो (L&T), बजाज फिनसर्व्ह, टायटन आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे शेअर्स वाढीसह बंद झाले.

Share Market
JSW Infrastructure IPO: गुंतवणूकदार मालामाल! BSE वर 20% प्रीमियमसह कंपनी झाली लिस्ट

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्समध्ये आज मारुती सुझुकीचे शेअर्स 2.59 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक घसरले. याशिवाय एनटीपीसी, सन फार्मा, टाटा मोटर्स आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

Share Market
GST Notice: ड्रीम 11 ला DGGIचा दणका! पाठवली 28,000 कोटी रुपयांची नोटीस, काय आहे प्रकरण?

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 17,000 हजार कोटींची वाढ झाली आहे

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 29 सप्टेंबर रोजी 319.23 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, जे त्याच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवार, 29 सप्टेंबर रोजी 319.06 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 17 हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 17 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.