Share Market Closing: सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात विक्री, सेन्सेक्स 64,600 च्या खाली, गुंतवणूकदारांचे 12 लाख कोटींचे नुकसान

Share Market Closing: शेअर बाजारात सर्वाधिक विक्री मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये झाली.
Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today Most of the sales were in midcap and smallcap stocks 23 October 2023
Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today Most of the sales were in midcap and smallcap stocks 23 October 2023 Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 23 October 2023:

सोमवारी (23ऑक्टोबर) सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीची नोंद झाली. प्रमुख बाजार निर्देशांक घसरणीसह बंद झाले. आयटी, बँकिंग आणि वाहन क्षेत्रातील शेअर्समुळे बाजारावर दबाव होता. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. विक्रीच्या 4 दिवसांत गुंतवणूकदारांचे सुमारे 12 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीची नोंद झाली. यामुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप सुमारे 12 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

23 ऑक्टोबर रोजी ते 312 लाख कोटी रुपयांच्या खाली घसरले आहे, तर 17 ऑक्टोबर रोजी बाजार बंद झाल्यानंतर, सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 323.87 लाख कोटी रुपये होते. सोमवारी बाजारात सर्वाधिक विक्री करणाऱ्यांमध्ये मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सचा समावेश होता.

Share Market Closing 23 October 2023 (S&P BSE SENSEX)
Share Market Closing 23 October 2023 (S&P BSE SENSEX)Sakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात सर्वच क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. आयटी, बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, मीडिया, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस यांसारख्या क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली आहे.

आजच्या व्यवहारात सर्वात मोठी घसरण मिड कॅप शेअर्समध्ये दिसून आली. निफ्टीचा मिड कॅप निर्देशांक 1,100 अंकांपेक्षा अधिक घसरला. स्मॉल कॅप निर्देशांक 500 अंकांनी घसरला आहे.

Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today Most of the sales were in midcap and smallcap stocks 23 October 2023
Anil Ambani: अनिल अंबानींच्या कंपनीने 6 महिन्यात पैसे केले दुप्पट, 3 वर्षात दिला 17 पट परतावा

निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

आजच्या व्यवहारात 3990 शेअर्सपैकी 3188 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर 644 शेअर्स तेजीसह बंद झाले. 158 शेअर्सच्या दरात कोणताही बदल झाला नाही. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 4 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 26 शेअर्स घसरले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 2 शेअर्स वाढीसह तर 48 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today Most of the sales were in midcap and smallcap stocks 23 October 2023
TV Market: दिवाळीच्या तोंडावर चिनी कंपन्यांचा धक्कादायक निर्णय, भारतातलं उत्पादन करणार बंद

सेन्सेक्समधील कोणत्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली?

सेन्सेक्सवर 30 शेअर्स सूचीबद्ध आहेत, त्यापैकी फक्त दोन शेअर्स M&M आणि Bajaj Finance - आज तेजीसह बंद झाले. दुसरीकडे जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील आणि इंडसइंड बँकेत आज सर्वात मोठी घसरण झाली.

देशांतर्गत बाजारात घसरण का झाली?

इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात हजारो जीव गेले आहेत. सध्या युद्ध थांबण्याची शक्यता नाही. परिणामी कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ नोंदवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 93 डॉलरवर पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.