Share Market Closing: शेअर बाजारात पुन्हा तेजी; फार्मा-FMCG क्षेत्रात जोरदार खरेदी, सेन्सेक्स- निफ्टीची काय स्थिती?

Share Market Closing: BSE सेन्सेक्स 173 अंकांनी वाढून 66,118 वर बंद झाला.
Share Market Latest Updates
Share Market Latest UpdatesSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 27 September 2023: बुधवारी शेअर बाजारात तेजी होती. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 173 अंकांनी वाढून 66,118 वर बंद झाला. निफ्टीही 51 अंकांनी वाढून 19,716 वर पोहोचला.

तर सेन्सेक्सने 65,549 इंट्राडे नीचांक गाठला. बाजारातील तेजीमध्ये फार्मा आणि FMCG क्षेत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

आजच्या व्यवहारात आयटी, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, इन्फ्रा, हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. मिडकॅप शेअर्स खरेदीमुळे निफ्टीचा मिड कॅप निर्देशांक 302 अंकांच्या उसळीसह 40,640 अंकांवर बंद झाला.

स्मॉल कॅप शेअर्समध्येही वाढ झाली आणि निर्देशांक 0.98 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. मात्र, आजच्या व्यवहारात बँकिंग आणि वित्तीय सेवा शेअर्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 21 शेअर्स वाढीसह आणि 9 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 30 शेअर्स वाढीसह आणि 20 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market closing 27 September 2023 (S&P BSE SENSEX)
Share Market closing 27 September 2023 (S&P BSE SENSEX)Sakal

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये वाढ

Omaxe Limited चे शेअर्स 17.18 टक्क्यांच्या तेजीसह टॉप गेनर्समध्ये होते. सेन्को गोल्ड शेअर्स 14.40% वाढले. त्याचप्रमाणे साई सिल्कचा शेअर 10.31 टक्क्यांनी, उज्वल स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर 8.89 टक्क्यांनी, टाटा इन्व्हेस्टमेंटचा शेअर 8.77 टक्क्यांनी आणि आयटीआय लिमिटेडचा शेअर 7.12 टक्क्यांनी वाढला.

Share Market Latest Updates
Vedanta Shares: वेदांता कर्जाच्या सापळ्यात, मूडीजच्या अहवालानंतर कंपनीला मोठा झटका

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

वेदांत लिमिटेडचे ​​शेअर्स 6.69 टक्क्यांच्या घसरणीसह टॉप लुझर्समध्ये होते. अॅबी कॉट्सपिन 4.97 टक्क्यांनी घसरले आणि फ्यूचर लाइफस्टाइल, KIOCL लिमिटेड आणि झेन्सार टेक्नॉलॉजीच्या शेअर्सचे नुकसान झाले.

Share Market Latest Updates
Video Viral: 102 कोटी रुपयांचे शेअर्स असलेला 'बिगबुल', आजोबांच्या व्हिडिओने घातला धुमाकूळ

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.57 लाख कोटी रुपयांची वाढ

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 22 सप्टेंबर रोजी वाढून 319.72 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच मंगळवार, 26 सप्टेंबर रोजी 318.15 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.57 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.57 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.