Share Market Closing: शेअर बाजार किंचीत तेजीसह बंद; सेन्सेक्स 64,981 वर, कोणते शेअर्स चमकले?

Share Market Closing: सेन्सेक्स 38 अंकांनी वाढला आणि 64,981 वर बंद झाला.
Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today realty, oil & gas, pharma gain 8 November 2023
Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today realty, oil & gas, pharma gain 8 November 2023 Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 8 November 2023:

बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात सपाट व्यवहार दिसून आला. BSE सेन्सेक्स 38 अंकांनी वाढला आणि 64,981 वर बंद झाला. निफ्टीनेही 36 अंकांची उसळी घेत 19,443 वर पोहोचला. ऑटो, एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला खालच्या पातळीवरून पाठिंबा मिळाला, तर बाजारावर बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील विक्रीचा दबाव होता.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

आजच्या व्यवहारात मिड कॅप शेअर्समध्ये पुन्हा जोरदार वाढ दिसून आली. निफ्टीचा मिड कॅप निर्देशांक 397 अंकांच्या किंवा 0.99 टक्क्यांच्या वाढीसह 40,447 अंकांवर बंद झाला, तर निफ्टीचा स्मॉल कॅप निर्देशांक 92 अंकांच्या उसळीसह 13,335 अंकांवर बंद झाला.

आजच्या व्यवहारात फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, कमोडिटी कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. बँकिंग, आयटी आणि मीडिया शेअर्समध्ये घसरण झाली.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 15 शेअर्स वाढीसह आणि 15 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 33 शेअर्स वाढीसह आणि 17 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today realty, oil & gas, pharma gain 8 November 2023
रिलायन्स इंडस्ट्रीज करणार देशातील सर्वात मोठी बाँड विक्री, 20 हजार कोटी रुपये उभारण्याचा प्लॅन

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 15 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. त्यातही एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.09 टक्क्यांनी वाढ झाली. तर टायटन, लार्सन अँड टुब्रो (L&T), ITC आणि JSW स्टीलचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सेन्सेक्समधील उर्वरित 15 शेअर्स आज लाल रंगात म्हणजेच घसरणीसह बंद झाले. यामध्येही ICICI बँकेचे शेअर्स सर्वाधिक 1.44 टक्क्यांनी घसरले. याशिवाय एनटीपीसी, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि टाटा स्टीलचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today realty, oil & gas, pharma gain 8 November 2023
Air India: शिंदे सरकारने एअर इंडियाची इमारत घेतली विकत; 'इतक्या' कोटींना झाली डील

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.54 लाख कोटी रुपयांची वाढ

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 8 नोव्हेंबर रोजी 320.55 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे मंगळवारी, 7 नोव्हेंबर रोजी 319.01 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.54 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.54 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.