Share Market Closing: शेअर बाजार विक्रमी अंकांनी कोसळला; सेन्सेक्स 900 अंकांनी खाली, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

Share Market Closing: BSE सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला आणि 63,148 च्या जवळ पोहचला.
Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today Tata Steel Sbi Life Pfizer share Asian Paint share price 26 October 2023
Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today Tata Steel Sbi Life Pfizer share Asian Paint share price 26 October 2023 Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 26 October 2023:

गुरुवारी (26 ऑक्टोबर) सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारावर दबाव होता. BSE सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला आणि 63,148 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीही 264 अंकांनी घसरून 18,857 वर बंद झाला. बँकिंग, फायनान्शिअल आणि ऑटो मेटल सेक्टर्सची बाजारात सर्वाधिक विक्री झाली.

शेअर बाजारात विक्रीचे कारण

  • हमास-इस्रायलमध्ये तणाव कायम आहे

  • यूएस बाँड उत्पन्नात वाढ, जवळपास 5%

  • FII ची सतत विक्री

  • हेवीवेट शेअर्समध्ये विक्री

Share Market Closing 26 October 2023 (S&P BSE SENSEX)
Share Market Closing 26 October 2023 (S&P BSE SENSEX)Sakal

गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटी रुपयांचे नुकसान

बाजारातील जोरदार घसरणीमुळे आज गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. मागच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजे 25 ऑक्टोबर 2023 रोजी, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 309.22 लाख कोटी रुपये होते. आज म्हणजेच 26 ऑक्टोबर 2023 रोजी ते 306.32 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात 2.9 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today Tata Steel Sbi Life Pfizer share Asian Paint share price 26 October 2023
Gold Rate Today: चांदीने 72 हजारांचा टप्पा केला पार, सोन्याचे भावही वाढले, जाणून घ्या आजचा भाव?

सेन्सेक्समधील फक्त 5 शेअर्स तेजीत

सेन्सेक्सवर 30 शेअर्सची नोंद आहे, त्यापैकी फक्त 5 शेअर्स आज तेजीसह बंद झाले. यामध्येही केवळ अॅक्सिस बँकेचा शेअर 1 टक्क्यांहून अधिक वाढला. दुसरीकडे, M&M, बजाज फायनान्स आणि एशियन पेंटमध्ये आज सर्वात मोठी घसरण झाली.

Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today Tata Steel Sbi Life Pfizer share Asian Paint share price 26 October 2023
Why Market Fall: शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरुच; 6 दिवसात 20 लाख कोटींचे नुकसान, काय आहेत कारणे?

मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचे तर गार्डन रीच शिप बिल्डरचे शेअर्स सुमारे 10 टक्क्यांनी वाढले. अॅक्सिस बँकेचा शेअर 1.85 टक्क्यांनी वाढून बंद झाला तर पतंजली फूड्सने एक टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली.

गुरुवारी एसबीआय कार्ड, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती सुझुकी, मुथूट फायनान्स, टाटा मोटर्स, आयआरसीटीसी, एचडीएफसी बँक, फेडरल बँक आणि देवयानी इंटरनॅशनल सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.