Share Market Closing: ऐतिहासिक तेजीनंतर शेअर बाजार उच्चांकावरून घसरला, गुंतवणूकदारांचे 'इतक्या' कोटींचे नुकसान

गुरुवारचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरले
Share Market
Share MarketSakal
Updated on

Share Market Closing 13 July 2023: गुरुवारचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरले, बीएसई सेन्सेक्स प्रथमच 66,000 चा टप्पा पार करण्यात यशस्वी झाला. मात्र हा ऐतिहासिक टप्पा गाठल्यानंतर बाजार वरच्या स्तरावरून मोठ्या प्रमाणात घसरला.

सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकावरून 600 अंकांनी खाली घसरला. त्यामुळे निफ्टीतही 180 अंकांची घसरण पाहायला मिळाली. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स 770 आणि निफ्टी 183 अंकांच्या उसळीसह व्यवहार करत होता.

आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 186 अंकांच्या उसळीसह 65,578 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 36 अंकांच्या उसळीसह 19,423 अंकांवर बंद झाला.

Share Market Closing 13 July 2023
Share Market Closing 13 July 2023Sakal

शेअर बाजाराची क्षेत्रीय स्थिती

आजच्या ट्रेडिंग सत्रात मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. याशिवाय ऑटो, एफएमसीजी, फार्मा, एनर्जी, मीडिया, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स घसरले.

मात्र, आयटी, बँकिंग धातू, रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 14 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 16 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 18 शेअर्स वधारले तर 32 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market
Mutual Funds Investment: शेअर बाजार ऐतिहासिक उच्चांकावर, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची 'ही' योग्य वेळ आहे का?

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

बीएसई सेन्सेक्समध्ये टीसीएसच्या शेअर्सनी 2.47 टक्क्यांची उसळी घेतली. यासह, इन्फोसिसचे शेअर्स 2.40 टक्क्यांनी, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्स प्रत्येकी एक टक्का वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सेन्सेक्सवर पॉवर ग्रिडचा शेअर सर्वात जास्त 3.35 टक्क्यांनी घसरला. याशिवाय मारुती, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचयूएल, नेस्ले इंडिया, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, टायटन, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, सन फार्मा आणि एचसीएल टेक यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण

आज रिलायन्स इंडस्ट्रीजसह मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये मोठी घसरण झाली आहे. या स्थितीत बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 295.96 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.

बुधवारच्या व्यापाराचे बाजार भांडवल 301.61 लाख कोटी रुपये झाले असते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.65 लाख रुपयांची घट झाली आहे.

Share Market
Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.