Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद, 3 दिवसानंतर बाजारात खरेदी; सेन्सेक्स 65,400 वर बंद

Share Market Closing: सकाळी बाजार घसरणीसह उघडला आणि तेजीसह बंद झाला.
Share Market
Share MarketSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 14 August 2023: सोमवारी (14 ऑगस्ट) शेअर बाजारात जोरदार खरेदी दिसून आली. सकाळी बाजार घसरणीसह उघडला आणि तेजीसह बंद झाला. BSE सेन्सेक्स 79 अंकांनी वाढून 65,401 वर बंद झाला. निर्देशांकाने 64,821 या इंट्राडे नीचांकालाही स्पर्श केला. त्याचप्रमाणे निफ्टी देखील 19,413 वर बंद झाला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी (15 ऑगस्ट) शेअर बाजार बंद राहणार आहे.

एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रांचा बाजाराच्या रिकव्हरीला पाठिंबा मिळाला. याशिवाय हेवीवेट शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात तेजी आली. RIL चा शेअर सुमारे 2% वाढीसह सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढणारा होता.

याशिवाय इन्फोसिस, एचयूएल, एलअँडटी, टीसीएस, आयटीसी यांसारख्या हेवीवेट शेअर्समध्ये खरेदी झाली. जेएसडब्ल्यू स्टीलसह टाटा स्टीलचे शेअर्स, एसबीआयचा शेअर सर्वाधिक घसरणीसह बंद झाला.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

JSW स्टीलचा शेअर आज सेन्सेक्सवर सर्वाधिक 2.47 टक्क्यांनी घसरला. त्याचप्रमाणे एसबीआय, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, मारुती, एचसीएल टेक, टायटन आणि सन फार्मा यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market
CAG Report 2023: 18 कोटी ऐवजी 250 कोटी उधळले! एक्सप्रेस वेच्या बांधकामात मोठा घोटाळा, कॅगनं केला खुलासा

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

आयटी आणि एफएमसीजी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रे घसरणीसह बंद झाली. धातू निर्देशांकात सर्वाधिक दोन टक्क्यांची घसरण दिसून आली. त्याच वेळी पॉवर, रिअल इस्टेट आणि पीएसयू बँकेत 0.5 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.

बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.5-0.5 टक्क्यांनी घसरले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 13 शेअर्स वाढीसह आणि 17 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीतील 50 शेअर्सपैकी 23 शेअर्स वाढले तर 27 शेअर्स घसरले.

Share Market
Adani-Hindenburg case: सेबीने अदानी ग्रुप आणि हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली 15 दिवसांची मुदतवाढ

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज रुपया 82.95 वर बंद झाला. मागील सत्रात रुपया 82.85च्या पातळीवर बंद झाला होता.

Share Market
Flight Ticket Offer: स्वातंत्र्यदिनी स्वस्तात विमान प्रवास करण्याची सुवर्णसंधी! स्पाइसजेट देतयं स्पेशल ऑफर

गुंतवणूकदारांचे 1 लाख कोटी रुपये बुडाले

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सोमवार, 14 ऑगस्ट रोजी 303.68 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे जे त्याच्या मागील ट्रेडिंग दिवसाच्या म्हणजेच शुक्रवार, 11 ऑगस्ट रोजी 304.68 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.