Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल! का आपटला बाजार?

Share Market Closing: निफ्टी जवळपास 300 अंकांनी घसरून 19,450 च्या जवळ आहे.
Share Market
Share MarketSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 2 August 2023:

शेअर बाजारात कमकुवत जागतिक संकेतांमुळे मोठी घसरण झाली आहे. बाजाराच्या कमजोरीमुळे बीएसई सेन्सेक्स सुमारे 1,000 अंकांनी घसरला आहे. त्याचप्रमाणे निफ्टीही जवळपास 300 अंकांनी घसरून 19,450 च्या जवळ आहे. बाजारात मोठी विक्री होत आहे, ज्यामध्ये ऑटो, मेटल आणि पीएसयू बँकिंग क्षेत्रातील शेअर्स आघाडीवर आहेत.

आजच्या व्यवहाराच्या शेवटी बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 303.29 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे, तर मागील ट्रेडिंग सत्रात मार्केट कॅप 306.80 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यापारात 3.51 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

बाजारातील प्रचंड घसरणीची कारणे

  • FITCH ने US चे रेटिंग केले कमी

  • अमेरिकन, युरोपियन आणि आशियाई बाजारात जोरदार विक्री

  • डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण

  • हेवीवेट स्टॉक्समध्ये जोरदार विक्री

शेअर बाजारात झालेली घसरण
शेअर बाजारात झालेली घसरण Sakal
Share Market
Investment Tips: वयाच्या 40 व्या वर्षी निवृत्त व्हा! बँकेत असतील 1 कोटी, 15x15x15 आहे श्रीमंत बनण्याचा फॉर्म्युला

शेअर बाजाराची क्षेत्रीय स्थिती

आज सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. ऑटो, कॅपिटल गुड्स, पीएसयू बँक, पॉवर आणि मेटल निर्देशांकात दोन टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली.

त्याचप्रमाणे हेल्थकेअर, आयटी आणि तेल आणि वायू निर्देशांकात एक टक्क्याहून अधिक घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप 1.50-1.50 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

Share Market
DLF KP Singh: 91 व्या वर्षी प्रेमात पडणारे DLFचे चेअरमन कंपनीतून पडले बाहेर, मुलींनीही विकला हिस्सा

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

बीएसई सेन्सेक्सवर टाटा स्टील आणि टाटा मोटर्सचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक घसरले. याशिवाय लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, पॉवरग्रिड, एचडीएफसी बँक, टायटन, आयटीसी, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँक बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये 1 टक्क्य़ांपेक्षा जास्त घसरण झाली.

याशिवाय विप्रो, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, मारुती, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचे शेअर्स 0.50 टक्क्यांहून अधिक घसरले.

Share Market
Investment Tips: वयाच्या 40 व्या वर्षी निवृत्त व्हा! बँकेत असतील 1 कोटी, 15x15x15 आहे श्रीमंत बनण्याचा फॉर्म्युला

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स एक टक्क्यांहून अधिक तेजीसह बंद झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.