Share Market Closing: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्समध्ये 213 अंकांची वाढ, कोणत्या कंपन्यांनी केले मालामाल?

Share Market Closing: बाजारात बँकिंग क्षेत्र तेजीत होते.
Share Market latest updates today
Share Market latest updates today Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 23 August 2023: बुधवारी (23ऑगस्ट) सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. BSE सेन्सेक्स 213 अंकांच्या वाढीसह 65,433 वर बंद झाला आहे. त्याचप्रमाणे निफ्टीही 47 अंकांनी वर चढत 19,444 वर बंद झाला आहे.

बाजारात बँकिंग क्षेत्र तेजीत होते. NSE वर निफ्टी बँक निर्देशांक 1 टक्क्यांनी वाढून बंद झाला. एफएमसीजी, फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये विक्रीची झाली.

Share Market Closing Latest Update 23 August 2023 (S&P BSE SENSEX)
Share Market Closing Latest Update 23 August 2023 (S&P BSE SENSEX)Sakal

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

क्षेत्रीय आघाडीवर आज संमिश्र कल दिसून आला. बँक, मेटल आणि कॅपिटल गुड्समध्ये 0.5-1 टक्क्यांची वाढ दिसून आली. त्याच वेळी, पॉवर, एफएमसीजी, तेल आणि वायूमध्ये 0.3-1 टक्क्यांची घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप 0.5-0.5 टक्क्यांनी वधारले.

Share Market latest updates today
Jio Financial Share: 23,700 कोटींचे नुकसान, मुकेश अंबानींच्या नवीन कंपनीची सलग तिसऱ्या दिवशी घसरण

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

आयसीआयसीआय बँक, एसबीआय, लार्सन अँड टुब्रो, मारुती आणि टाटा स्टीलचे शेअर्स सेन्सेक्समध्ये एक टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले.

याशिवाय कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, पॉवरग्रिड, एचडीएफसी बँक, टीसीएस, इन्फोसिस आणि बजाज फिनसर्व्ह यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 20 शेअर्स वाढीसह आणि 10 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 31 शेअर्स वाढीसह आणि 19 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market latest updates today
Chandrayaan 3: चांद्रयान 3 च्या लँडिंगपूर्वीच सरकारी कंपनीनं रचला मोठा विक्रम, इतिहासात होणार नोंद

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सेन्सेक्सवरील जिओ फायनान्शिअलचा शेअर सर्वाधिक 5 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याचप्रमाणे सन फार्मा आणि भारती एअरटेलचे शेअर्सही प्रत्येकी एक टक्‍क्‍यांहून अधिक घसरणीसह बंद झाले.

याशिवाय टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा अँड महिंद्रा, विप्रो, एशियन पेंट्स, टायटन आणि इंडसइंड बँक यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market latest updates today
Bank Fraud Case: वरुण इंडस्ट्रीजवर FIR दाखल, दोन बँकांची 388 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा कंपनीवर आरोप

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ

आजच्या व्यवहारात बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 308.96 लाख कोटी रुपये आहे, जे मागील सत्रात 308.35 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 61,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()