Share Market Closing: बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांना दिलासा, सेन्सेक्स 62,000 च्या वर, 'या' शेअर्समध्ये...

शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले.
Share Market latest updates today
Share Market latest updates today Sakal
Updated on

Share Market Closing 12 May 2023: शुक्रवारी शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. सेन्सेक्स 117 अंकांनी वाढून 62,021 वर बंद झाला. सकाळच्या व्यवहारादरम्यान तो 61,578 च्या पातळीवरही घसरला होता. त्याचप्रमाणे निफ्टीही 14 अंकांच्या वाढीसह 18,311 वर बंद झाला.

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये व्यवहारी आठवड्यात प्रत्येकी दीड टक्क्यांनी वाढ झाली. यादरम्यान बँकिंग शेअर्सनी चांगली कामगिरी केली. एका आठवड्यात इंडसइंड बँकेचा शेअर सुमारे 13 टक्क्यांनी वाढला. खराब निकालामुळे डॉ. रेड्डीजचा स्टॉक 10 टक्क्यांनी घसरला.

Share Market Closing 12 May 2023
Share Market Closing 12 May 2023Sakal

निफ्टीवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

एनएसई निफ्टीवरील आयशर मोटर्सच्या शेअरची किंमत सर्वाधिक 5.86 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाली. महिंद्रा आणि महिंद्राचा शेअर्स 1.90 टक्क्यांनी, इंडसइंड बँक 1.73 टक्क्यांनी, अॅक्सिस बँक 1.68 टक्क्यांनी आणि हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) 1.03 टक्क्यांनी वाढला.

निफ्टीवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

NSE निफ्टीमध्ये हिंदाल्कोच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.58 टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय बीपीसीएल, पॉवरग्रीड, एनटीपीसी आणि टाटा स्टील यांचे शेअर्सही 1.50 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले.

Share Market latest updates today
GST Tax: देशातील 24 आयातदारांनी चुकवला तब्बल 11 हजार कोटी रुपयांचा कर, सरकारणे पाठवली नोटीस

दानी समूहाचे शेअर्स:

गेल्या अनेक दिवसांपासून तोट्यात असलेल्या अदानी समूहाच्या शेअर्ससाठीही आजचा दिवस वाईट ठरला. या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात समुहाच्या जवळपास सर्वच शेअर्सना एक दिवसापूर्वी झालेल्या जोरदार तेजीनंतर मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. काही शेअर्स तर ट्रेडिंग दरम्यान लोअर सर्किटला धडकले.

जाणून घ्या तज्ञांचे मत :

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, अमेरिका आणि चीनमधील कमकुवत आर्थिक आकडेवारीमुळे आर्थिक वाढ मंदावण्याची चिन्हे दिसत आहेत.

यूएसमध्ये मंदीचा धोका वाढला आहे कारण यूएस बेरोजगारीचा दर ऑक्टोबर 2021 पासून सर्वोच्च पातळीवर आहे. त्याचबरोबर उत्पादकांच्या दरातही माफक प्रमाणात वाढ झाली आहे.

देशांतर्गत बाजारात दुपारनंतर रिकव्हरी दिसून आली कारण भारताचा महागाई दर पाच टक्क्यांच्या खाली राहण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे.

Share Market latest updates today
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()