Share Market Closing 20th March 2023 : बाजार दिवसभरातील नीचांकी पातळीवर घसरला आहे. सेन्सेक्स 57,200 आणि निफ्टी 16,850 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आयटी, मेटल, बँकिंगसह रिअॅल्टी शेअर्समध्ये मोठी विक्री झाली आहे.
शेअर बाजाराच्या घसरणीचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे, कारण BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप रु. 255.64 लाख कोटींवर आले आहे.
जे 17 मार्च रोजी रु. 257.59 लाख कोटी होते. म्हणजेच घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 1.95 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
बाजार विक्रीमध्ये अदानी आणि बजाज समूहाचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक नुकसान करणारे ठरले. तर BPCL 2 टक्क्यांच्या वर व्यवहार करत आहे. याआधी शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही वाढ नोंदवण्यात आली. सेन्सेक्स 355 अंकांनी 57,989.90 वर तर निफ्टीही 114 अंकांच्या वाढीसह 17,100 वर बंद झाला.
शेअर बाजारातील घसरणीची कारणे :
जगभरातील बाजारपेठांमधून कमकुवत संकेत
डॉलर निर्देशांक वाढला, 103.80 पार
जागतिक बँकिंग व्यवस्थेची स्थिती बिकट आहे
RIL, SBI, INFOSYS सह इतर दिग्गज शेअर्स घसरले
आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, धातू, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल आणि वायू आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तर एफएमसीजी, मीडिया सेक्टरच्या शेअरने वेग पकडला.
मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकही घसरले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 5 शेअर्स हिरव्या चिन्हात आणि 25 शेअर्स लाल चिन्हात बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 13 शेअर्स वाढले तर 37 शेअर्स घसरले.
'या' शेअर्समध्ये तेजी :
आजच्या व्यवहारात एचयूएल 2.61 टक्के, बीपीसीएल 2.35 टक्के, आयटीसी 0.87 टक्के, ग्रासिम 0.48 टक्के, नेस्ले 0.42 टक्के, कोटक महिंद्रा 0.39 टक्के, सन फार्मा 0.37 टक्के वाढीसह बंद झाले.
'या' शेअर्समध्ये घसरण :
घसरलेल्या शेअर्समध्ये बजाज फिनसर्व्ह 4.33 टक्क्यांनी, अदानी एंटरप्रायझेस 3.82 टक्क्यांनी, बजाज फायनान्स 3.17 टक्क्यांनी, हिंदाल्को 2.76 टक्क्यांनी आणि विप्रो 2.48 टक्क्यांनी घसरले.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट :
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट झाली आहे. शेअर बाजार BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 255.64 लाख कोटी रुपयांवर आले आहे, जे शुक्रवारी 257.59 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.95 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.