Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्समध्ये 250 अंकांची वाढ, ऑटो शेअर्सचे काय झाले?

आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद झाला.
Share Market
Share MarketSakal
Updated on

Share Market Closing 20 June 2023: आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. आजच्या व्यवहाराच्या सत्रादरम्यान बाजाराची सुरुवात सपाट झाली पण नंतर बाजारात रिकव्हरी दिसून आली.

आयटी आणि ऑटो शेअर्सनीही बाजारात चांगली कामगिरी केली, त्यामुळे शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 159 अंकांनी वाढून 63,327 वर बंद झाला. याशिवाय निफ्टी बँक 132 अंकांनी वाढून 43,766 वर बंद झाला. तर निफ्टी 61 अंकांनी वाढून 18,816 वर बंद झाला.

आज मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली. दुसरीकडे पीएसई, एनर्जी, इन्फ्रा निर्देशांकात किंचित वाढ झाली. तर फार्मा शेअर्समध्ये विक्री झाली.

अदानी एंटरप्रायझेस, कोटक महिंद्रा बँक, हीरो मोटोकॉर्प, अॅक्सिस बँक आणि अदानी पोर्ट्स हे शेअर्स निफ्टीमध्ये घसरले. तर एचडीएफसी लाइफ, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा आणि टीसीएस हे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले.

आजच्या व्यवहारात सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीसह बंद झाले. पॉवर आणि ऑटो निर्देशांक 1 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर मेटल आणि आयटी 0.5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

Share Market Closing 20 June 2023
Share Market Closing 20 June 2023Sakal
Share Market
Bank Holiday in July 2023: जुलै महिन्यात आहेत भरमसाठ सुट्या, ‘इतके' दिवस बँका राहणार बंद! गैरसोय टाळण्यासाठी पाहा यादी

आजच्या व्यवहारात बँकिंग क्षेत्र, ऑटो, आयटी, एफएमसीजी, धातू, रिअल इस्टेट, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर हेल्थकेअर, फार्मा आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्स घसरले.

मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप निर्देशांकांनीही नेत्रदीपक तेजी घेतली. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 35 शेअर्स वाढीसह आणि 15 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 18 शेअर्स वाढले तर 12 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

गुंतवणूकदारांनी 1.24 लाख कोटी कमावले

आज BSE वर सूचीबद्ध झालेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 20 जून रोजी 293.79 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे जे त्याच्या मागील ट्रेडिंग दिवसाच्या म्हणजेच सोमवार 19 जून रोजी 292.50 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.24 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.24 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()