Share Market Closing: आर्थिक वर्षाच्या शेवटच्या सत्रात शेअर बाजारात विक्रमी वाढ; गुंतवणूकदार झाले मालामाल

Share Market Today: गुरुवारी शेअर बाजारात जबरदस्त खरेदी झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक तजीसह बंद झाला. सेन्सेक्स 639 अंकांनी वाढून 73,635 वर पोहोचला. निफ्टीने 203 अंकांची उसळी घेत 22,326 वर पोहोचला.
Share Market Closing Sensex ends up 650pts, Nifty at 22,320; Bank, FS, Auto, Pharma, Health gain
Share Market Closing Sensex ends up 650pts, Nifty at 22,320; Bank, FS, Auto, Pharma, Health gainSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 28 March 2024: गुरुवारी शेअर बाजारात जबरदस्त खरेदी झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स 639 अंकांनी वाढून 73,635 वर पोहोचला. निफ्टीने 203 अंकांची उसळी घेत 22,326 वर पोहोचला. सरकारी बँकिंग शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली. मेटल, वाहन आणि फार्मा क्षेत्रातही प्रचंड वाढ झाली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. मीडिया हे एकमेव क्षेत्र आहे ज्यांचे शेअर्स घसरले.

Share Market
Share MarketSakal

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदी झाली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 26 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 4 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 42 शेअर्स वाढीसह आणि 8 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

कोणते शेअर्स वाढले?

बजाज फिनसर्व्ह 3.65 टक्क्यांनी, ग्रासिम इंडिया 3.50 टक्क्यांनी, Hero Moto Coop 3.30 टक्क्यांनी आणि बजाज फायनान्स 3.14 टक्क्यांनी वाढले आहेत.

Share Market
Share MarketSakal

आजच्या बाजारातील तेजीमध्ये बँकिंग शेअर्सचा बोलबाला होता. हाऊसिंग फायनान्स कंपनी बजाज हाऊसिंग फायनान्सने IPO बद्दल अनेक गुंतवणूक बँकांशी बोलणी सुरू केल्याचे वृत्त दिल्यानंतर बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह प्रत्येकी 4 टक्क्यांनी वाढले.

Share Market Closing Sensex ends up 650pts, Nifty at 22,320; Bank, FS, Auto, Pharma, Health gain
MGNREGA Wage: निवडणुकीपूर्वी कामगारांना मोदी सरकारची मोठी भेट; मनरेगाच्या मजुरीत केली वाढ, काय आहेत नवे दर?

आज ॲक्सिस बँक 0.50 टक्के, रिलायन्स 0.37 टक्के, टेक महिंद्रा 0.26 टक्के आणि एचसीएल टेक 0.26 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

गुंतवणूकदारांनी 3.27 लाख कोटी कमावले

BSE वर कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 28 मार्च रोजी वाढून 386.91 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे बुधवारी 27 मार्च रोजी 383.64 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 3.27 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 3.27 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

शेअर बाजारात वाढ का होत आहे?

1. अमेरिकन शेअर बाजारात तेजी

महागाईच्या आकडेवारीच्या आधी बुधवारी यूएस बाजारात तेजी होती. S&P 500 44.91 अंकांनी किंवा 0.86 टक्क्यांनी वाढून 5,248.49 वर पोहोचला. Nasdaq Composite 83.82 अंकांनी किंवा 0.51 टक्क्यांनी वाढून 16,399.52 वर पोहोचला.

Share Market Closing Sensex ends up 650pts, Nifty at 22,320; Bank, FS, Auto, Pharma, Health gain
Electoral Bond: 'इलेक्टोरल बाँड हा जगातील सर्वात मोठा घोटाळा', निर्मला सीतारामन यांच्या पतीचे वक्तव्य चर्चेत

2. FII आणि DII द्वारे जबरदस्त खरेदी

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्हीके विजयकुमार म्हणाले की, शेअर बाजारातील वाढीमागील प्रमुख कारण म्हणजे मोठ्या गुंतवणूकदारांकडून येणारा पैसा.

ते म्हणाले, "देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) गेल्या 7 दिवसांत 24,373 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) बुधवारी 2,170.32 कोटी रुपयांची खरेदी केली आहे.''

3. शेअर बाजारात चौफेर खरेदी

आजच्या व्यवहारादरम्यान, निफ्टी मीडिया वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीत होते. निफ्टी बँक निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक वाढला. निफ्टी पीएसयू बँक जवळपास 2 टक्के वाढला. निफ्टी एनर्जी, निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर आणि निफ्टी हेल्थकेअर देखील 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह व्यवहार करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.