आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर मार्केट लाल निशाणावर बंद झालं. बाजारात विक्रीचा जोर कायम राहिल्यामुळे फार्मा वगळता सर्व क्षेत्रांमध्ये मंदी दिसून आली. यामुळे दोनच दिवसांपूर्वी रेकॉर्ड ब्रेक केलेला सेन्सेक्स आज पुन्हा ६३ हजारांच्या खाली गेला.
शुक्रवारी मार्केट बंद होताना सेन्सेक्स २५७ अंकांनी खाली गेला होता. तर, निफ्टीदेखील १०२ अंकांनी कोसळला. सेन्सेक्स बंद होताना ६२,९८२ अंकांवर होता, तर निफ्टी १८,६६८ अंकांवर बंद झाला.
केवळ फार्मा तेजीत
आज कंझ्यूमर ड्यूरेबल, आयटी, बँकिंग, एनर्जी, ऑटो, मेटल्स, एमएमजीसी, इन्फ्रा, मीडिया आणि रिअल इस्टेट अशा सर्व क्षेत्रांमध्ये पडझड दिसून आली. केवळ फार्मा कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. दरम्यान, मिड कॅप इंडेक्समध्ये ४३५ अंकांची घट झाल्याचे दिसून आले, आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्ये १२६ अंकांची घट झाली.
सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी केवळ ७ शेअर्स ग्रीन झोनमध्ये होते. तर, २३ शेअर्स रेड झोनमध्ये राहिले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी १० शेअर्स तेजीत राहिले, तर ४० शेअर्स रेड झोनमध्ये क्लोज झाले.
३ लाख कोटींचे नुकसान
आजच्या एका दिवसात गुंतवणुकदारांचे तब्बल ३ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. गुरुवारी बीएसईचं मार्केट कॅप २९२.३० लाख कोटी रुपये एवढं होतं. तर आज मार्केट बंद होताना हीच किंमत २८९.४५ लाख कोटींवर आली होती. म्हणजेच, आजच्या एका दिवसात गुंतवणुकदारांचे २.८५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. गेल्या दोन दिवसांमध्ये गुंतवणुकदारांचं सुमारे पाच लाख कोटींचं नुकसान झाल्याचं दिसून आलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.