Share Market Investment: 'या' NBFC शेअरने गाठला विक्रमी उच्चांक, आणखी तेजीचा तज्ज्ञांना विश्वास

Share Market Investment: गेल्या वर्षी कंपनीचे शेअर्स देशांतर्गत बाजारात 474 रुपयांवर लिस्ट झाले होते.
Share Market Tips
Share Market TipsSakal
Updated on

Share Market Investment: फाईव्ह स्टार बिझनेस फायनान्सचे (Five Star Business Finance) शेअर्स गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लिस्ट झाले आणि आतापर्यंत त्याने गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक परतावा दिला. आता जून तिमाहीच्या उत्कृष्ट निकालांनंतर तो 19 टक्क्यांहून अधिक तेजीसह 866.95 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.

बाजारातील तज्ज्ञांच्या मते ही तेजी काही थांबणार नाही आणि तो सध्याच्या पातळीपासून यात 12 टक्क्यांहून अधिक वाढ दिसू शकते. जून तिमाहीत त्याचा निव्वळ नफा वार्षिक 31.8 टक्क्यांनी वाढून 183.7 कोटीवर गेला आहे.

या काळात कंपनीचा महसूल 42.2 टक्क्यांनी वाढून 480.4 कोटी रुपये झाला आणि लोन डिस्बर्समेंट 99 टक्क्यांनी वाढून 1132 कोटी झाली. सध्या बीएसईवर हे शेअर्स 747.05 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकसह नऊ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील सूक्ष्म-उद्योजक आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींना बिझनेस लोन देते.

Share Market Tips
Multibagger Stock: 19 रुपयांच्या शेअरने केले मालामाल! आता कंपनी देणार 1 शेअरमागे 100 रुपयांचा डिव्हिडेंड

गेल्या वर्षी हे शेअर्स देशांतर्गत बाजारात 474 रुपयांवर लिस्ट झाले होते. या पातळीपासून आतापर्यंत 83 टक्क्यांनी झेप घेत हा शेअर 866.95 रुपयांवर पोहोचला आहे, म्हणजेच अवघ्या 9 महिन्यांत गुंतवणूकदारांच्या भांडवलात 83 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्सच्या शेअर्सने सोमवारी इंट्रा-डेमध्ये 800 रुपयांची लेव्हल ओलांडली होती, पण नंतर प्रॉफीट बुकिंगमुळेहे शेअर्स या पातळीच्या खाली घसरले.

Share Market Tips
Multibagger Stock: 10 रुपये किंमत असणाऱ्या पेनी स्टॉकची कमाल, LIC ने 48 खरेदी केले लाख शेअर्स

या एनबीएफसीसाठी एप्रिल-जून 2023 ही सलग चौथी तिमाही उत्कृष्ट ठरली आहे. अशात देशांतर्गत ब्रोकरेज नुवामा इन्स्टिट्यूशनलने स्टॉकवर खरेदी रेटिंग कायम ठेवली आहे आणि टारगेट 720 रुपयांवरून 840 रुपये केले आहे.

Share Market Tips
Multibagger Stock: बोनस शेअर्ससह स्टॉक स्प्लिट जाहीर, गुंतवणूकदारांच्या पैशात 32 पट वाढ, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.