Share Market : किचन सिंक बनवणाऱ्या कंपनीने बनवले करोडपती, तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

कंपनी किचन सिंक बनवणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे.
Share Market
Share MarketSakal
Updated on

Share Market Investment Tips : शेअर बाजारात असे काही स्टॉक्स आहेत, ज्यांच्यावर बाजाराच्या चढ उताराचा फरक पडत नाही. अशाच शेअर्समध्ये कॅरीसिलच्या (Carysil) शेअर्सची गणना होते. कॅरीसिल कंपनी किचन सिंक बनवणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे.

या शेअर्सने बाजाराच्या घसरणीच्या दिवसांतही भरारी घेतलीय. बीएसई सेन्सेक्स शुक्रवारी रेड झोनमध्ये दिसतो आहे तर कॅरीसिलचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 558 रुपयांवर ट्रेड करत आहे.

लाँग टर्मचा विचार केल्यास अतिशय कमी गुंतवणुकीवर या शेअरने त्यांच्या गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

ही कंपनी किचन सिंक, स्पाउट्स, फूड वेस्ट डिस्पोजर युनिट्स, ओव्हन, हॉब्स, कुकटॉप्स, वाईन चिलर आणि डिशवॉशर तयार करते. त्यांची उत्पादने जगभरातील 58 पेक्षा जास्त देशांमध्ये विकली जातात.

Share Market
IPO News : क्रेयॉन्सची IPO एन्ट्री; किंमतीपासून गुंतवणुकीपर्यंत सर्व काही जाणून घ्या

कॅरीसिल शेअर्सने केवळ 67 हजारांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे आणि तेही अवघ्या 16 वर्षांत. त्याचे शेअर्स 2 मार्च 2007 रोजी केवळ 3.70 रुपयांना मिळत होते आणि आता ते 151 पटीने वाढून 558 रुपयांवर पोहोचले आहेत.

गेल्या वर्षी 4 एप्रिल 2022 रोजी तो 900 रुपयांच्या एका वर्षातील उच्चांकावर होता. पण त्यानंतर 9 महिन्यांत 18 जानेवारी 2023 रोजी तो 52 टक्क्यांनी घसरून 431.35 रुपयांवर आला, जो एका वर्षातील नीचांक आहे.

कॅरीसिलने आपला व्यवसाय वाढवण्याची योजना आखली आहे. त्यासाठी सध्याच्या प्लांट्सजवळ आणखी जमीन खरेदी करण्याचा त्यांचा विचार आहे. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत 1,000 कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत कंपनीची कमाई फारशी नव्हती, पण ते पुन्ही रिकव्हर होतील असा विश्वास ब्रोकरेज फर्म व्यक्त करत आहेत. शिवाय त्यांनी 784 रुपयांच्या टारगेटसह यात खरेदी करण्याचा सल्लाही दिला आहे.

Share Market
योग्य निर्णय घेण्याची क्षमता असेपर्यंतच करा इच्छापत्र

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.