Share Market : बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस; शेअर घ्यावे की नको ? संपूर्ण विश्लेषण

कंपनीचे २०,००० कर्मचारी आहेत आणि या कंपनीने ६.२ कोटींहून अधिक व्हिसा अर्जांवर प्रक्रिया केली
share market investment option BLS International Services Ltd share price
share market investment option BLS International Services Ltd share pricesakal
Updated on
Summary

कंपनीचे २०,००० कर्मचारी आहेत आणि या कंपनीने ६.२ कोटींहून अधिक व्हिसा अर्जांवर प्रक्रिया केली

- ऋत्विक जाधव

बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लि. ही टूर आणि ट्रॅव्हलसंबंधित सेवा देणाऱ्या क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीचे भांडवली बाजारमूल्य ८,५४,९१६.४२ लाख रुपये आहे. ही कंपनी चार दशके जुन्या बीएलएस उद्योगसमूहाचा एक भाग असून, व्हिसा, पासपोर्ट, कॉन्स्युलेटमधील विविध सेवांसह व्हिसा क्षेत्रातील तीन आघाडीच्या जागतिक कंपन्यांमध्ये गणली जाते.

ही कंपनी ६२ देश आणि ३६ सरकारी ग्राहकांसह नागरिक सेवा आणि जगभरात असलेल्या आपल्या २३२५ कार्यालयांद्वारे सेवा प्रदान करते. कंपनीचे २०,००० कर्मचारी आहेत आणि या कंपनीने ६.२ कोटींहून अधिक व्हिसा अर्जांवर प्रक्रिया केली आहे.

कंपनीने केनियातील रॉयल थाई दूतावास, मुंबई आणि नवी दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथील रॉयल थाई वाणिज्य दूतावासाकडून व्हिसावर प्रक्रिया करण्यासाठी आणि उत्तर अमेरिका व मेक्सिकोमध्ये जर्मन व्हिसावर प्रक्रिया करण्यासाठी करार मिळवलेले आहेत. कंपनीने आपले कर्जही कमी केले असून, ती जवळजवळ कर्जमुक्त झाली आहे.

तांत्रिक विश्लेषण

या शेअरचा चार्ट पॅटर्न इतरांच्या तुलनेत सर्वांत मजबूत आहे. बीएलएस इंटरनॅशनल गेल्या काही दिवसांपासून मजबूत होण्याची चिन्हे दाखवत आहे आणि किमतीने जोरदार ब्रेकआउट दिला आहे. डिसेंबर २०२२ पासून तयार होत असलेल्या ‘त्रिकोण पॅटर्न’ची निर्मिती आपण पाहू शकतो.

मार्च २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत हा शेअर मजबूत अपट्रेंडमध्ये आहे. त्याने कूल ऑफ किंवा कन्सोलिडेशन टप्प्यात प्रवेश केला असून, तो मोठ्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे. अलीकडे, शेअर मोठ्या प्रमाणात वाढला आणि आणखी एक अपट्रेंड येण्याची चिन्हे आहेत.

share market investment option BLS International Services Ltd share price
Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टीने रचला इतिहास; 'या' शेअर्समध्ये जोरदार खरेदी

हे भविष्यात शेअरची ताकद आणि क्षमता दर्शवते. डेरिव्हेटिव्ह डेटादेखील तेजीच्या बाजूने आहे. भविष्यातील ‘ओआय’मध्ये लाँग बिल्ड-अप दिसून येते, जे अल्पावधीतही ताकद दर्शवते. हा शेअर २०७ रुपयांच्या आसपास ट्रेडिंग करताना २०० रुपयांच्या रेंजमध्ये १९० रुपयांचा स्टॉप लॉस ठेवून साप्ताहिक क्लोजिंग आधारावर खरेदी करणे सुरू केले पाहिजे.

येत्या काही दिवसांत या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अल्प मुदतीसाठी, २५० रुपये ही आमची उद्दिष्ट किंमत असेल. पुढील मध्यम मुदतीसाठीचे उद्दिष्ट २८० रुपये आहे.

share market investment option BLS International Services Ltd share price
Share Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कोणते शेअर्स मिळवून देतील नफा; काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

अल्प मुदतीच्या उद्दिष्टासाठी, रिस्क टू रिवॉर्ड गुणोत्तर १:३ आहे, जे गुंतवणुकीचा निर्णय अधिक योग्य बनवते. एक छोटी जोखीम घेऊन, आम्ही मोठ्या लक्ष्यांची अपेक्षा करत आहोत. या कंपनीमध्ये सुमारे ३० टक्के नफ्याच्या अपेक्षेने गुंतवणूक करू शकतो.

शेअरचे नाव - बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लि.

शिफारस - खरेदी करा

सध्याचा भाव - रु. २०७.३५

स्टॉप लॉस - रु. १९०

उद्दिष्ट - रु. २५०

कालावधी - ३ ते ६ महिने

share market investment option BLS International Services Ltd share price
Share Market Closing: शेअर बाजाराने मोडले सर्व विक्रम; सेन्सेक्स 800 अंकांच्या वर, काय आहे तेजीचे कारण?

डिस्क्लेमर आणि डिस्क्लोजर

(वरील शिफारस पूर्णपणे तांत्रिक विश्लेषणावर आधारित आहे, जी भविष्यातील किमतीच्या हालचालीचा अंदाज लावण्याचा एक प्रकारचा वैज्ञानिक मार्ग आहे. सर्व गुंतवणूकदारांनी इक्विटी गुंतवणुकीतील जोखमींबद्दल योग्य माहिती घ्यावी. लेखकांचे कोणतेही वैयक्तिक हितसंबंध यात नाहीत आणि या शेअरमध्ये त्यांची गुंतवणूक नाही. तथापि, त्यांच्या क्लायंट्सची काही पोझिशन असू शकते.)

(लेखक तांत्रिक विश्लेषक आहेत आणि किरण जाधव अँड असोसिएट्स, पुणे येथे काम करतात.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.