Share Market Investment Tips: बुधवारी सकाळच्या टप्प्यात बाजारात घसरण दिसून आली, मात्र त्यानंतर रिकव्हरी दिसून आली. या रिकव्हरीमुळे सेन्सेक्स-निफ्टी दिवसाच्या उच्च पातळीवर बंद झाले. शेवटी सेन्सेक्स 149 अंकांच्या वाढीसह 65996 वर बंद झाला.
तर निफ्टी 62 अंकांच्या वाढीसह 19633 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी बँक 84 अंकांनी घसरून 44881 वर बंद झाला. मिडकॅप 125 अंकांनी वाढून 38037 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
बुधवारी शेअर बाजार जवळपास सपाट उघडल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. दिवसभर त्यात प्रचंड अस्थिरता होती. पण शेवटच्या तासात झालेल्या खरेदीमुळे निफ्टी 60 अंकांच्या वाढीसह बंद करण्यात यशस्वी झाला.
निफ्टीसाठी सध्या 19648 आणि 19729 च्या आसपास रझिस्टंस दिसत आहे. इथून पुन्हा दबाव वाढू शकतो. निफ्टीमधील बुधवारची तेजी हा काउंटर ट्रेंड पुल बॅक आहे. शॉर्ट टर्ममध्ये आपण निफ्टीमध्ये कंसोलिडेशन पाहू शकतो, जे आपल्याला 19100 पर्यंत खाली जाताना दिसून शकते.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
डॉ. रेड्डी (DRREDDY)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
हिन्दाल्को (HINDALCO)
टाटा मोटर्स (TATAMOTORS)
महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)
भारत फोर्ज (BHARATFORG)
ट्रेंट (TRENT)
व्होल्टास (VOLTAS)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
ऑरो फार्मा (AUROPHARMA)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.