Share Market Today: आजच्या व्यापार सत्रात कोटक बँक, नेसले इंडियासह कोणते शेअर्स मिळवून देतील नफा, काय सांगतात तज्ज्ञ?

आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या निकालांपूर्वी ट्रेडर्स सावध आहेत.
Share Market Today
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Investment Tips: बुधवारी बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बेंचमार्क इंडेक्स लाल रंगात बंद झाले. आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या निकालांपूर्वी ट्रेडर्स सावध दिसले.

निफ्टी 50 इंडेक्स 55.10 अंकांनी अर्थात 0.28 टक्क्यांनी घसरून 19384.30 वर बंद झाला. त्याच वेळी, बीएसई सेन्सेक्स 0.34 टक्के किंवा 223.94 अंकांनी घसरून 65393.90 वर बंद झाला.

सलग सातव्या ट्रेडिंग सत्रात निफ्टीने 19,300-19,550 च्या रेंजमध्ये व्यवहार केल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले, डेली चार्टवर, निफ्टीला 19,500 - 19,550 च्या आधीच्या स्विंग हायच्या जवळ रझिस्टंसचा सामना करावा लागला.

आवर्ली मोमेंटम इंडिकेटरने नकारात्मक क्रॉसओव्हर सुरू केला आहे. निफ्टीमध्ये साईडवेज कंसोलिडेशनमुळे दबाव आहे. निफ्टी 19,300-19,550 ची रेंज तोडून त्याच्या वर बंद होईपर्यंत कंसोलिडेशन चालू राहील असे त्यांचे म्हणणे आहे.

बाजाराचा एकूण कल सकारात्मक असला तरी निफ्टी सध्या टाइम करेक्शनमधून जात आहे. यासाठी 19,300 - 19,280 वर सपोर्ट आहे. तर 19,460 - 19,485 वर रझिस्टंस आहे.

Share Market Today
Multibagger Stock Update: इंडियन ऑईलसोबतच्या भागीदारीमुळे 'या' शेअरमध्ये तुफान तेजी, तेजीचा तज्ज्ञांना विश्वास

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • ओएनजीसी (ONGC)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • पीएनबी (PNB)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Share Market Today
Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.