Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी इन्फोसिस, पीएनबीसह कोणते शेअर्स मिळवून देतील नफा, काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

बाजारातील खरेदीमुळे निफ्टी 19600 च्या आसपास बंद झाला.
Share Market Investment Tips
Share Market Investment Tips sakal
Updated on

Share Market Investment Tips: शुक्रवारी बाजार तेजीसह बंद झाला. बाजारातील खरेदीमुळे निफ्टी 19600 च्या आसपास बंद झाला. सर्व सेक्टरल इंडेक्स हिरव्या रंगात बंद झाले. आयटी निर्देशांकात 4 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

तर मेटल आणि रियल्टी इंडेक्स 1 टक्क्याच्या वाढीसह बंद झाला. व्यवसायाच्या शेवटी सेन्सेक्स 502.01 अंकांच्या अर्थात 0.77 टक्क्यांच्या वाढीसह 66060.90 वर बंद झाला. तर निफ्टी 150.70 अंकांच्या म्हणजेच 0.78 टक्क्यांच्या वाढीसह 19564.50 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

अमेरिकेतील महागाई कमी झाल्यामुळे यूएस फेडकडून दरवाढ होणार नसल्याची आशा असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. आयटी कंपन्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या निकालांनीही बाजाराला साथ दिली आहे.

त्यामुळे सेन्सेक्स 66000 च्या पुढे बंद झाला आहे. एफआयआयने केलेल्या खरेदीमुळेही बाजाराला चालना मिळाली आहे.

निफ्टीने इंट्राडे चार्टवर ब्रेकआउट दिला आहे आणि डेली आणि विकली चार्टवर बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार केला आहे, जो सध्याच्या पातळीपासून बाजारात आणखी तेजीचे संकेत देत आहे.

ट्रेंड फॉलो करणाऱ्या ट्रेडर्ससाठी 19450 ची पातळी ट्रेंड डिसायडर लेव्हल असेल. निफ्टी या पातळीच्या वर टिकून राहिला तर तो 19800 पर्यंत वाढू शकतो. दुसरीकडे, जर तो 19450 च्या खाली गेला तर 19400-19300 पर्यंत त्यात घसरण होऊ शकते.

दुसरीकडे 20 दिवसांचा एसएमए (सिंपल मूव्हिंग ऍव्हरेज) किंवा 44500 पातळी ही बँक निफ्टीसाठी निर्णायक पातळी असेल.

याच्या वर, इंडेक्स 45250-45600 ची लेव्हल पुन्हा तपासू शकतो. दुसरीकडे, 44500 च्या खाली गेल्यास बँक निफ्टी 50-दिवसांच्या एसएमए किंवा 44000 पर्यंत खाली जाऊ शकतो.

Share Market Investment Tips
Multibagger Stock Updates: 2 वर्षात 1 लाखाचे झाले 5,00,000, 'या' शेअरने गुंतवणूकदारांना दिला दमदार परतावा

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • टीसीएस (TCS)

  • इन्फोसिस (INFY)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • एलटीआय माईंडट्री (LTIM)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • पीएनबी (PNB)

  • ए यू बँक (AUBANK)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Share Market Investment Tips
Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.