आयटीसी, भारत फोर्जसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आज मिळवून देतील नफा, तज्ज्ञांनी सूचवले हे 10 शेअर्स

Share Market Tips: आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत शेअर बाजारात चढ उतार होत आहे.
Share Market Today
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Investment Tips: जागतिक बाजारात चांगली तेजी असूनही मंगळवारी निफ्टी अस्थिरतेच्या दरम्यान फ्लॅट बंद झाला. इंडेक्स तेजीसह उघडला पण सेशनचा शेवट 19,397 वर तीन अंकांनी होण्याआधी 19,381-19,444 च्या रेंजमध्ये ट्रेड करत राहिला.

इंडेक्सने डेली चार्टवर अप्पर शॅडोसह एक लहान बियरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार केला. हा पॅटर्न उच्च स्तरावर स्ट्रेंथच्या कमतरतेचे संकेत देतो आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

गेल्या आठवड्यापासून निफ्टी इंडेक्स 19,500-19,250 च्या रेंजमध्ये किंवा 20-डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज (EMA) 19,475 आणि 50-DEMA 19,275 मध्ये ट्रेड करत आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जोपर्यंत वरची किंवा खालची रेंज निर्णायकपणे खंडित होत नाही तोपर्यंत कंसोलिडेशन चालू राहील. लोअर टॉप आणि बॉटम्स लेव्हल सारखे नेगेटीव्ह चार्ट पॅटर्न सुरूच आहेत. निफ्टी एका अरुंद रेंजमध्ये छोटा लोअर टॉप बनवताना दिसतो.

Share Market Today
LICचा अजब निर्णय! घसरणीनंतरही अंबानींच्या कंपनीत केली मोठी गुंतवणूक, विकत घेतला 6.66 टक्के हिस्सा

निफ्टी 19,300-19,250 च्या आसपास सपोर्टची टेस्ट वारंवार घेत आहे. पण अपट्रेंड टिकवून ठेवण्यासाठी स्ट्रेंथ नसल्यामुळे हा सपोर्ट तुटू शकतो. पण ओव्हरहेड रझिस्टन्स 19,450-19,500 च्या आसपास दिसत आहे.

Share Market Today
Credit Card: क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर सावधान, ही छोटीशी चूक पडू शकते महाग, अशी घ्या काळजी

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरटेन्मेंट (ADANIENT)

  • एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

  • आयटीसी (ITC)

  • एनटीपीसी (NTPC)

  • हिरोमोटोकॉर्प (HEROMOTOCO)

  • ए यू बँक (AUBANK)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • एम फॅसिस (MPHASIS)

Share Market Today
Biggest IPO in 2023: सॉफ्ट बँक आणणार या वर्षीचा सर्वात मोठा IPO, किंमतीसह सर्व माहिती एका क्लिकवर

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.