Share Market Today: शेअर बाजारातील प्रचंड अस्थिरतेमध्ये आज कोणते शेअर्स मिळवून देतील मोठा नफा?

Share Market Tips: एक्स्पायरीच्या दिवशी बाजारात प्रचंड अस्थिरता होती
Share Market
Share Market Sakal
Updated on

Share Market Investment Tips: शेअर बाजार गुरुवारी मागील ट्रेडिंग सत्रातील सर्व नफा गमावत बाजार लाल चिन्हात बंद झाला. ऑटो, ऑईल अँड गॅस, मेटल आणि एफएमसीजी शेअर्समधील विक्रीमुळे निफ्टी 19650 च्या जवळ बंद झाला.

व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 440.38 अंकांनी अर्थात 0.66 टक्क्यांनी घसरून 66266.82 वर आणि निफ्टी 118.40 अंकांनी म्हणजेच 0.60 टक्क्यांनी घसरून 19659.90 वर बंद झाला.

बाजाराने आदल्या रात्रीच्या यूएस फेडच्या दरवाढीकडे दुर्लक्ष केले आणि आशियाई बाजारातील सकारात्मक जागतिक संकेतांसह दिवसाची सुरुवात मजबूत केली. पण दुपारपर्यंत बाजारात प्रॉफिट बुकींग दिसून आली आणि बाजार लाल चिन्हावर घसरला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

एक्स्पायरीच्या दिवशी बाजारात प्रचंड अस्थिरता होती असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. यूएस फेडने आणखी एकदा दर वाढवण्याचे संकेत दिल्यानंतर बाजाराचा मूड खराब झाला. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी ऑटोमोबाईल, बँकिंग आणि ऑईल अँड गॅसच्या शेअर्समध्ये प्रॉफीट बूक केले.

तांत्रिकदृष्ट्या, निफ्टीने डेली चार्टवर लोअर टॉप आणि बियरीश कँडल तयार केली आहे. जी सध्याच्या पातळीपासून बाजारात आणखी करेक्शनचे संकेत देत आहे.

आता व्यापार्‍यांसाठी, 19800 वर रझिस्टंस दिसत आहे. जर निफ्टीने हा अडथळा पार केला तर तो 19875-19900 पर्यंत वाढू शकतो. तर 19800 च्या खाली टिकून राहिल्यास, करेक्शन 19600-19550 पर्यंत जाऊ शकते.

Share Market
UPI Payment : रूपे क्रेडिट कार्डाद्वारे येस बँकेची यूपीआय सुविधा

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

  • ब्रिटानिया (BRITANNIA)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • पीएनबी (PNB)

Share Market
Digital Payment : डिजिटल व्यवहारांमध्ये तेरा टक्के वाढ

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.