Share Market Today: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

मंगळवारी शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून आली.
Share Market
Share Market Sakal
Updated on

Share Market Investment Tips: मंगळवारी शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून आली. दुसऱ्या सेशनमध्ये बाजारात थोडी खरेदी झाल्याने सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ झाली. मात्र, निफ्टी पुन्हा एकदा सार्वकालिक उच्चांक (All Time High) ओलांडण्यात अपयशी ठरला.

निफ्टी त्याच्या सार्वकालिक उच्चांकाच्या खाली 70 अंकांनी बंद झाला. मंगळवारी बाजाराला फायनांशियल सर्व्हिसेस शेअर्समुळे चांगला सपोर्ट मिळाला. निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस इंडेक्सनेही सार्वकालिक उच्चांक गाठला.

निफ्टी 50 इंडेक्स 126.20 अंकांनी अर्थात 0.68 टक्क्यांनी वाढून 18817.40 वर बंद झाला. त्याच वेळी सेन्सेक्स 446.03 अंकांनी म्हणजेच 0.71 टक्क्यांनी वाढून 63,416.03 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी मंगळवारी किंचित वाढीसह उघडला आणि त्यानंतर काही प्रमाणात तेजी आल्याचे इंक्रेड इक्विटीजचे गौरव बिस्सा म्हणाले. व्यापार सत्राच्या दुसऱ्या सत्रात इंडेक्सने वेग घेतला आणि आणखी मजबूत झाला.

निफ्टी 100 हून अधिक अंकांनी वाढून दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाला. बँक निफ्टीलाही सपोर्ट मिळाल्याने बाजार 44000 च्या वर पोहोचला.

निफ्टी आपला नवीन सार्वकालिक उच्चांक सेट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. निफ्टीला 18700 च्या जवळ मजबूत सपोर्ट आहे. 18700 आणि 18750 स्ट्राइक पुट ऑप्शन्समध्ये मजबूत रायटींग झाले, जे सूचित करते की या स्तरांवर कोणत्याही इंट्राडे घसरणीवर खरेदी केली जाऊ शकते.

Share Market
PhonePe : एका दिवसात करु शकता किती व्यवहार? 'फोन-पे'चे काय आहेत निर्बंध? जाणून घ्या

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Share Market
Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.