Share Market Investment Tips: बुधवारी शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी वाढ दिसून आली. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, सेन्सेक्स 11.43 अंकांनी अर्थात 0.02 टक्क्यांनी वाढून 65087.25 वर आणि निफ्टी 4.80 अंकांनी म्हणजेच 0.02 टक्क्यांनी वाढून 19347.50 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती?
बाजार संमिश्र संकेतांच्या दरम्यान अस्थिर राहिला आणि फ्लॅट बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांचे म्हणणे आहे. गॅप-अप स्टार्टनंतर, निफ्टी एका रेंजमध्ये फिरत राहिला आणि शेवटच्या तासांमध्ये विक्रीच्या दबावाने सर्व इंट्राडे प्रॉफीट गमावून बसला.
परिणामी निफ्टी 19347.45 या दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. दरम्यान मेटल आणि रियल्टीमध्ये चांगली वाढ झाली. तर एनर्जी आणि बँकिंग कमजोर राहिले. मात्र, लहान आणि मध्यम शेअर्समध्ये तेजी कायम राहिली.
चांगले जागतिक संकेत असूनही, निफ्टी शॉर्ट टर्म मूव्हिंग एव्हरेज किंवा 20 दिवसांचा इएमए पुन्हा मिळवण्यात अयशस्वी ठरला. बुल्स आपली पकड सोडवण्याच्या मनस्थितीत नसल्याचे हे संकेत आहेत. पुढे जाऊन सेन्सेक्स-निफ्टीमधील कमजोरी कायम राहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, मिड आणि स्मॉल कॅप्समध्ये तेजी येऊ शकते.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (JIOFIN)
टाटा स्टील (TATASTEEL)
मारुती (MARUTI)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)
इंडियन हॉटेल (INDHOTEL)
ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.