Share Market Today: आज शेअर बाजारात कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी? 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Investment Tips: काल सेन्सेक्स-निफ्टी अस्थिर व्यवहारानंतर घसरणीसह बंद झाले.
Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Adani Enterprises Hindustan Unilever Adani Ports 10 november 2023 know details
Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Adani Enterprises Hindustan Unilever Adani Ports 10 november 2023 know details Sakal
Updated on

Share Market Investment Tips: सेन्सेक्स-निफ्टी गुरुवारी अस्थिर व्यवहारानंतर लाल रंगात बंद झाले. निफ्टी 19400 च्या खाली बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 143.41 अंक अर्थात 0.22 टक्क्यांच्या घसरणीसह 64,832.20 वर बंद झाला आणि निफ्टी 48.20 अंक म्हणजेच 0.25 टक्क्यांच्या घसरणीसह 19,395.30 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

गुरुवारी निफ्टी थोडा घसरल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. त्याला डेली टाईम फ्रेमवर मोठ्या मूव्हिंग एव्हरेजजवळ रझिस्टंसचा सामना करावा लागला. तेजीचा कल कमकुवत होण्याचे हे संकेत आहेच.

याशिवाय निफ्टी 21EMA च्या खाली घसरला जो तेजीचा प्रयत्न अयशस्वी होण्याचे लक्षण आहे. जोपर्यंत निफ्टी 19,500 च्या खाली राहील तोपर्यंत तो कमजोर राहील अशी शक्यता आहे. 19,500 पर्यंत विक्री होण्याची शक्यता आहे. खाली निफ्टीला 19,300 वर सपोर्ट आहे. हा सपोर्ट तुटल्यावर बाजारात करेक्शन दिसेल.

दुसरीकडे, निफ्टी बँक इंडेक्स दिवसभर बाजूला राहिला. इंडेक्सने 43,500 चा सपोर्ट कायम ठेवला पण 44,000 च्या महत्त्वपूर्ण रझिस्टंसपर्यंत पोहोचण्यात तो अयशस्वी ठरला. आता जोपर्यंत बँक निफ्टी 43,500 च्या वर राहील तोपर्यंत त्याचा कल पॉझिटीव्ह राहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, जर तो 43,500 च्या खाली घसरला तर तो 43,000-42,800 पर्यंत घसरेल.

Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Adani Enterprises Hindustan Unilever Adani Ports 10 november 2023 know details
Income Tax: व्होडाफोन-आयडियाला मिळणार 1,128 कोटींचा रिफंड; मुंबई उच्च न्यायालयाने दिला आदेश, काय आहे प्रकरण?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

  • ओएनजीसी (ONGC)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • ऍबॉट इंडिया (ABBOTINDIA)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Adani Enterprises Hindustan Unilever Adani Ports 10 november 2023 know details
Amazon Layoffs: अ‍ॅमेझॉनमध्ये पुन्हा कर्मचारी कपात; ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांना दिला नारळ

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.