Share Market Today: शेअर बाजारात घसरणीच्या काळात कोणते शेअर्स करतील मालामाल? तज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

Share Market Investment Tips: बुधवारी सेन्सेक्स-निफ्टी 25 ऑक्टोबरला सलग पाचव्या दिवशी तोट्यासह बंद झाले.
Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Apollo Hospitals Adani Enterprises SBI Life Insurance 26 October 2023 know details
Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Apollo Hospitals Adani Enterprises SBI Life Insurance 26 October 2023 know details Sakal
Updated on

Share Market Investment Tips: बुधवारी सेन्सेक्स-निफ्टी 25 ऑक्टोबरला सलग पाचव्या दिवशी तोट्यासह बंद झाले. निफ्टी 19100 च्या आसपास बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 522.82 अंकांनी अर्थात 0.81 टक्क्यांनी घसरून 64,049.06 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 159.60 अंकांनी म्हणजेच 0.83 टक्क्यांनी घसरला आणि 19122.20 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

मिश्र जागतिक संकेतांदरम्यान बाजारात घसरण सुरूच असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांचे म्हणणे आहे. बुधवारी निफ्टी 0.50 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाला. सपाट सुरुवात झाल्यानंतर निफ्टी हळूहळू खाली सरकत असल्याचे दिसून आले.

त्याने 19200 चा महत्त्वाचा सपोर्ट तोडला आणि शेवटी 19150.35 वर बंद झाला. रिऍल्टी, फायनान्शिअल आणि आयटीला सर्वाधिक फटका बसला. ब्रॉडर इंडेक्सही दबावाखाली राहिला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स 0.5 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

निफ्टीने ब्रॉडनिंग फॉर्मेशनचा खालचा पट्टा म्हणजे 19200 मोडला. आता त्यासाठी पुढील मोठा सपोर्ट 200 इएमएवर दिसत आहे जो सध्या 18830 च्या पातळीच्या आसपास आहे.

हे मागील एसोलीडेशन रेंजच्या नेकलाइन (ब्रेकआउट) झोनशी देखील जुळत असल्याचे दिसतेय. खराब जागतिक संकेत आणि ऑक्टोबर महिन्यासाठी डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्सची मुदत संपल्यामुळे अस्थिरता वाढेल.

Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Apollo Hospitals Adani Enterprises SBI Life Insurance 26 October 2023 know details
CarTrade: कारट्रेडने OLXचा ऑटो विक्री व्यवसाय केला बंद, 4 महिन्यांपूर्वीच विकत घेतली होती कंपनी

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • सिप्ला (CIPLA)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • पीएफसी (PFC)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • पॉलीकॅब (POLYCAB)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Apollo Hospitals Adani Enterprises SBI Life Insurance 26 October 2023 know details
Bank Holidays November 2023: सणासुदीत बँकांना असणार 'एवढ्या' दिवस सुट्या, पाहा संपूर्ण यादी

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.