Share Market Investment Tips: सलग दोन दिवसांचा निगेटिव्ह ट्रेंड गुरुवारच्या सत्रात बदलताना पाहायला मिळाला. 5 ऑक्टोबर रोजी निफ्टी 19550 च्या आसपास बंद झाला. दिवसाखेरीस सेन्सेक्स 405.53 अंकांच्या किंवा 0.62 टक्क्यांनी वधारून 65631.57 वर बंद तर निफ्टी 108.20 अंकांच्या किंवा 0.56 टक्क्यांनी वधारून 19,544.30 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती?
गुरुवारच्या सत्रात एकूण 2178 शेअर्स वधारलेले पाहायला मिळाले तर, 1361 शेअर्स घसरलेले पाहायला मिळाले. विविध सेक्टर्सवर नजर टाकली तर, गुरुवारच्या सत्रात ऑटो, बँक, आयटी आणि कॅपिटल गुड्समध्ये 0.5 ते 1 टक्के वाढ झालेली दिसली. तर दुसरीकडे फार्मा, इलेक्ट्रिसिटी आणि पीएसयू बँकिंग सेक्टर्समध्ये विक्री पाहायला मिळाली.
कोटक सिक्युरिटीजच्या श्रीकांत चौहान यांचे मते, गुरुवारच्या सत्रात तेजी जरी पाहायला मिळाली असली तरीही व्याजदरात झालेली वाढ आणि मंदीच्या भीतीमुळे, नजीकच्या मध्यम कालावधीत बाजार नकारात्मक ट्रेंडसह अस्थिर राहू शकतो.
टेक्निकल चार्टवर जोपर्यंत निफ्टी 19,450 या पातळीवर राहील तोपर्यंत निफ्टीमध्ये कल सकारात्मक राहण्याची शक्यता आहे.
वरच्या बाजूला 50 दिवसांचा SMA (सिंपल मूव्हिंग अॅव्हरेज) किंवा पहिला रेझिस्टन्स 19,610 आणि दुसरा रेझिस्टन्स 19675 वर असेल. त्याचवेळी, खालच्या बाजूला 19,450 वर लगेचचा सपोर्ट पाहायला मिळतो. हा सपोर्ट ब्रेक झाल्यास बाजारात अधिक मंदी पाहायला मिळू शकते.
आज 'या' शेअर्सवर ठेवा नजर
बजाज ऑटो - BAJAJ-AUTO
एल अँड टी - LT
महिंद्रा अँड महिंद्रा - M&M
टायटन - TITAN
टीसीएस - TCS
इंडियन हॉटेल्स - INDHOTEL
इम्फसिस - MPHASIS
बाळकृष्ण इंडस्ट्रीज - BALKRISIND
गोदरेज प्रॉपर्टीज - GODREJPROP
ए यु बँक - AUBANK
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.