Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'हे' 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये; पाहा यादी

Share Market Investment Tips: मीडिया आणि फार्मा वगळता इतर सर्व क्षेत्र वाढीसह बंद झाले.
Share Market Investment Tips
Share Market Investment TipsSakal
Updated on

Share Market Investment Tips: सोमवारी बेंचमार्क इंडेक्स नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाले. निफ्टी 20,650 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 1383.93 अंकांच्या अर्थात 2.05 टक्क्यांच्या वाढीसह 68,865.12 वर बंद झाला आणि निफ्टी 418.9 अंकांच्या म्हणजेच 2.07 टक्क्यांच्या वाढीसह 20,686.80 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

सोमवारच्या व्यवहारात बुल्सने आपले मजबूत वर्चस्व दाखवले आणि सुरुवातीपासून इंडेक्स वाढतच राहिल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी निफ्टीने 418.90 अंकांच्या वाढीसह 20,686.80 चा नवीन उच्चांक गाठला.

मीडिया आणि फार्मा वगळता इतर सर्व क्षेत्र वाढीसह बंद झाले. यापैकी बँकिंग आणि एनर्जी क्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे. मिड आणि स्मॉलकॅप इंडेक्सने अंडरपरफॉर्म करताना दिसले, कारण केवळ इंडेक्स आधारित शेअर्समध्येच खरेदी दिसून आली.

Share Market Investment Tips
Zerodha Down: शेअर बाजार तेजीत असताना गुंतवणूकदार अडचणीत, झिरोधा अ‍ॅपवर ट्रेडिंग करताना...

डेली चार्टवर, निफ्टीने मजबूत बुलिश कँडल तयार केली आहे, जे मजबूत अपट्रेंडचे लक्षण आहे, तर कमी वेळेच्या फ्रेमवर म्हणजे आवर्ली चार्टवर, ओवरबॉट परिस्थिती आहे. आता बाजारात टाइम किंवा प्राइस करेक्श दिसून येईल. अशा परिस्थितीत, घसरणीवरच बाजारात एन्ट्री केली पाहिजे असेही ते म्हणाले.

Share Market Investment Tips
Share Market: भाजपच्या दणदणीत विजयानंतर कोणत्या शेअर्समध्ये तेजीचे संकेत? ब्रोकरेज फर्मने जाहीर केली यादी

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • बीपीसीएल (BPCL)

  • आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • पीएफसी (PFC)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.