Share Market Today: मार्केटमध्ये चांगली कमाई करण्यासाठी 'हे' 10 निवडक शेअर्स ठेवा लिस्टमध्ये

Share Market Investment Tips: दिवसभरच्या अस्थिरतेनंतर मंगळवारी बाजार तेजीसह बंद झाला.
Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today BPCL coal india concor hdfc amc 29 november 2023 know details
Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today BPCL coal india concor hdfc amc 29 november 2023 know details Sakal
Updated on

Share Market Investment Tips: दिवसभराच्या अस्थिरतेनंतर मंगळवारी बाजार तेजीसह बंद झाला. निफ्टी 19,900 च्या पुढे बंद झाला. 20 सप्टेंबरनंतर निफ्टी 19,900 च्या वर बंद करण्यात यशस्वी झाला.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 204.16 अंकांच्या अर्थात 0.31 टक्क्यांच्या वाढीसह 66,174.20 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 95.00 अंकांनी म्हणजेच 0.48 टक्क्यांनी वाढून 19,889.70 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बाजाराने आठवड्याची जोरदार सुरुवात केली, पण फॉलो-थ्रूच्या अभावामुळे तो बहुतेक वेळा मर्यादित राहिल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले.

ट्रेडिंग सत्राच्या शेवटच्या भागात अचानक आलेल्या वाढीने इंडेक्स 95 अंकांच्या वाढीसह 19,889.70 वर बंद झाला. सेक्टरल इंडेक्समध्ये एनर्जी, मेटल आणि पीएसयू बँकिंगमध्ये जास्त वाढ दिसून आली, तर फार्मा आणि एफएमसीजीला करेक्शनचा सामना करावा लागला.

डेली चार्टवर, इंडेक्सने बुलिश कँडलसहली नाही तर असेंडिंग ट्रायएंगल फॉर्मेशनच्या रुपात बहुप्रतिक्षित रेंज ब्रेकआउटही दिला आहे. पॅटर्ननुसार आता निफ्टीचे लक्ष्य 20,170 असे दिसते. आता निफ्टीला 20,045 वर रझिस्टंस दिसत आहे. तर खाली 19,800 वर सपोर्ट दिसत आहे.

Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today BPCL coal india concor hdfc amc 29 november 2023 know details
Affordable Laptop : फ्रेंच कंपनी थॉमसन भारतात बनवणार लॅपटॉप; स्मार्टफोनपेक्षाही कमी असणार किंमत!

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • बीपीसीएल (BPCL)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • ए यू बँक (AUBANK)

  • एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनी लि. (HDFCAMC)

Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today BPCL coal india concor hdfc amc 29 november 2023 know details
New Age Gold : 'न्यु एज गोल्ड', बचतीचा नवा फंडा? काय आहे जाणून घ्या!

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.