Share Market Today
Share Market TodaySakal

Share Market Today: शेअर बाजार उघडताच पैसे कमविण्याची सुवर्णसंधी, 'या' शेअर्समध्ये करा गुंतवणूक

Share Market Investment Tips: शेअर बाजारात सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी वाढ दिसून आली.
Published on

Share Market Investment Tips: शेअर बाजारात सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी वाढ दिसून आली. सेन्सेक्स 594.91 अंकांच्या अर्थात 0.92 टक्क्यांच्या वाढीसह 64,958.69 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 181.20 अंकांच्या म्हणजेच 0.94 टक्क्यांच्या वाढीसह 19,411.80 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

शेअर बाजाराने आठवड्याची जोरदार सुरुवात केली आणि अलीकडची वाढ कायम ठेवत सुमारे 1 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. एका गॅप-अप स्टार्टनंतर, निफ्टी दिवसातील बहुतांश काळ एका रेंजमध्ये राहिला आणि शेवटी 19398 या दिवसाच्या उच्चांकावर बंद झाला.

सर्व सेक्टर्समधील वाढीमुळे निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. मेटल, एनर्जी आणि फार्मा प्रत्येकी एक टक्क्यांहून अधिक वाढले. लघु आणि मध्यम शेअर्समध्येही वाढ दिसून आली.

अमेरिकन बाजारातील तेजीमुळे बाजाराला चांगला सपोर्ट मिळत आहे. आता निफ्टी 19500 च्या पुढील रझिस्टंसकडे जाताना पाहू शकतो. ग्लोबल मार्केटमधील हालचाली आणि बँकिंग शेअर्सचा सहभाग बाजाराची भविष्यातील दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

Share Market Today
Multibagger Stock: कंपनीच्या शेअरमध्ये केवळ 3 दिवसांत 33 टक्के वाढ, 406 कोटीच्या ऑर्डरमुळे तेजी

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • डिव्हीस लॅब (DIVISLAB)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • एल अँड टी (LT)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • पॉलीकॅब (POLYCAB)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

Share Market Today
Bharat Atta: सरकारची सर्वसामान्यांना दिवाळी भेट! आजपासून देशभरात स्वस्तात मिळणार पीठ, किती आहे किंमत?

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.