Share Market Investment Tips: बाजारातील दोन दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी इक्विटी इंडेक्स तेजीसह बंद झाले. कॅपिटल गुड्ससह ऑईल अँड गॅसचे शेअर्स वगळता इतर सेक्टर्समध्ये खरेदी दिसून आली. यामुळे गेल्या दोन सत्रांतील बहुतांश घसरण कमी झाली.
शेवटी सेन्सेक्स 275.62 अंकांनी अर्थात 0.42 टक्क्यांनी वाढून 65,930.77 वर बंद झाला. निफ्टी 89.40 अंकांनी म्हणजेच 0.45 टक्क्यांनी वाढून 19,783.40 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती?
निफ्टीमध्ये मंगळवारी गॅप अप ओपनिंग दिसून आल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. दिवसभरात ते कंसोलिडेटेड राहिले. शेवटी तो 89 अंकांनी वाढून बंद झाला. डेली चार्टवरील शेवटच्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये, निफ्टी 19875 - 19627 च्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे.
निफ्टी 19650 - 19600 च्या झोनच्या वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्ये घसरण झाल्यास, हा झोन सपोर्ट म्हणून काम करू शकतो. पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टी हा झोन होल्ड करेल आणि वरच्या दिशेने जाईल अशी आशा आहे.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
एसबीआय लाईफ (SBILIFE)
एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)
अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
हिन्दाल्को (HINDALCO)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
ऑरो फार्मा (AUROPHARMA)
ऍस्ट्रल (ASTRAL)
व्होल्टास (VOLTAS)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.