Share Market Investment Tips: सोमवारी बाजार बऱ्याच दिवसांच्या तेजीनंतर निवांत मूडमध्ये दिसून आला. व्यवहाराच्या शेवटी तो किंचित घसरणीसह बंद झाला. दिवसभराच्या चढउतारानंतर निफ्टी 21,400 च्या आसपास बंद झाला.
व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 168.66 अंकांनी अर्थात 0.24 टक्क्यांनी घसरून 71,315.09 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 38 अंकांच्या म्हणजेच 0.18 टक्क्यांच्या घसरणीसह 21,418.70 च्या पातळीवर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती?
सोमवारचा रेंजबाउंड ट्रेडिंग 38 अंकांच्या घसरणीसह 21,418.65 वर बंद झाल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले. सेक्टरल इंडेक्सवर नजर टाकली तर मीडिया आणि फार्मा शेअर्सने चांगली कामगिरी केली, तर रिऍलिटी आणि बँकिंग इंडेक्समध्ये प्रॉफीट बुकिंग दिसून आले.
मिड आणि स्मॉल कॅपने अनुक्रमे 0.22 टक्के आणि 0.56 टक्क्यांनी वाढ करून बेंचमार्क इंडेक्सपेक्षा चांगली कामगिरी केली. डेली टाईम फ्रेमवर, निफ्टीने आत इनसाइड डोजी कँडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे जो बाजार पुढच्या काळात एका रेंजमध्ये ट्रेड करेल याचे संकेत देतो. निफ्टीसाठी, 21,330 वर सपोर्ट आणि 21,500 वर दिसत आहे.
शिवाय, आवरली टाइम फ्रेमवर आरएसआय इंडिकेटर ओव्हरसोल्ड झोनमध्ये मंदीच्या क्रॉसओव्हरमधून जात आहे जे बाजारातील मंदीचे लक्षण आहे. 21,350 च्या खाली घसरण शॉर्ट टर्ममध्ये निफ्टीला 21,220/21,100 पर्यंत नेऊ शकते. तर वरच्या बाजूला 21,500 वर रझिस्टंसचा सामना करावा लागू शकतो.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
पॉवरग्रीड (POWERGRID)
आयटीसी (ITC)
टेक महिन्द्रा (TECHM)
आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
ए यू बँक (AUBANK)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.