Share Market Investment Tips: सोमवारी सलग चौथ्या दिवशी भारतीय बाजार घसरणीसह बंद झाले. निफ्टी 19,300 च्या खाली बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 825.74 अंकांच्या अर्थात 1.26 टक्क्यांच्या घसरणीसह 64,571.88 वर बंद झाला आणि निफ्टी 260.90 अंकांच्या म्हणजेच 1.34 टक्क्यांच्या घसरणीसह 19,281.80 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती?
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे व्यापाराच्या शेवटच्या तासात बेंचमार्क इंडेक्समध्ये मोठी घसरण झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले.
त्यामुळे विक्रीचा दबाव निर्माण होऊ लागला. व्याजदर आणि महागाई आणखी वाढल्याने गुंतवणूकदार आधीच चिंतेत आहेत. अशा स्थितीत इस्राइल-हमास संघर्षाने अनिश्चितता आणखी वाढवली आहे. ज्याचा परिणाम शेअर बाजारांवर दिसून येत आहे.
तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केल्यास निफ्टीने डेली चार्टवर बियरिश कँडल तयार केली आहे. हे सध्याच्या पातळीपासून आणखी कमकुवत होण्याचे संकेत आहेत.
डे ट्रेडर्ससाठी 19,400 वर रझिस्टंस आहे. याच्या खाली राहिल्यास निफ्टी 19,200-19,175 पर्यंत घसरेल. दुसरीकडे, जर 19,400 च्या वर गेल्यास निफ्टीमध्ये 19,450-19,500 पर्यंत वाढ दिसून येईल.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
एलटी माइंडट्री लिमिटेड (LTIM)
अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
हिन्दाल्को (HINDALCO)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
इंडियन हॉटेल (INDHOTEL)
फेडरल बँक (FEDERALBNK)
पीएफसी (PFC)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.