Share Market Today: घसरणीच्या काळात शेअर बाजारात गुंतवणुकीची सुवर्णसंधी; तज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

Share Market Investment Tips: सेन्सेक्स-निफ्टी सलग सहाव्या दिवशी घसरणीसह बंद झाले
 Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Mahindra & Mahindra Bajaj Finance Ltd Asian Paints 27 October 2023 know details
Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Mahindra & Mahindra Bajaj Finance Ltd Asian Paints 27 October 2023 know details Sakal
Updated on

Share Market Investment Tips: गुरुवारी सेन्सेक्स-निफ्टी 1 टक्क्यांहून अधिक घसरला. सेन्सेक्स-निफ्टी सलग सहाव्या दिवशी घसरणीसह बंद झाले आहेत. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 900.91 अंकांनी अर्थात 1.41 टक्क्यांनी घसरून 63148.15 वर आणि निफ्टी 264.90 अंकांनी म्हणजेच 1.39 टक्क्यांनी घसरून 18857.30 वर पोहोचला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

तांत्रिक दृष्टीकोनातून, बियरीश कँडल आणि डेली चार्टवरील कमकुवत इंट्राडे फॉर्मेशन सध्याच्या पातळीपासून आणखी घसरण दर्शवत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले.

जोपर्यंत निफ्टी 19000 च्या खाली ट्रेडिंग करत आहे तोपर्यंत कमजोरी कायम राहील. निफ्टी 18800-18725 या पातळीपर्यंत घसरताना दिसेल. दुसरीकडे, जर निफ्टी 19000 पार करण्यात यशस्वी झाला तर तो 19100-19150 पर्यंत वाढू शकतो.

बँक निफ्टीमध्ये जोरदार विक्री सुरू असल्याने तो 1.29 टक्क्यांनी घसरल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. बँक निफ्टी सध्या 43264 वर त्याच्या 200-दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज (200EMA) खाली व्यवहार करत आहे.

ही परिस्थिती मंदीचे वातावरण कायम राहण्याची संकेत देत आहे. आता निफ्टीचा पुढील सपोर्ट 42000 वर आहे. हा सपोर्ट टिकला नाही तर 41500-41200 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

 Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Mahindra & Mahindra Bajaj Finance Ltd Asian Paints 27 October 2023 know details
Cello World IPO: 30 ऑक्टोबरला येतोय सेलो वर्ल्ड लिमिटेडचा आयपीओ; संपूर्ण माहिती एका क्लिकवर

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • एशियिन पेन्ट्स (ASIANPAINT)

  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (HDFCAMC)

  • पॉलीकॅब लिमिटेड (POLYCAB)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

 Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Mahindra & Mahindra Bajaj Finance Ltd Asian Paints 27 October 2023 know details
Google Pay: आता गुगल पेवरुन घ्या सॅशे लोन, अगदी 111 रुपयांच्या हफ्त्यासह करु शकता परतफेड

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.