Share Market Today: शेअर बाजारात तेजी असताना कोणते शेअर्स चमकतील? तज्ज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

Share Market Investment Tips: शेअर बाजार स्थिर राहण्याचे संकेत आहेत
Share Market Investment Tips
Share Market Investment TipsSakal
Updated on

Share Market Investment Tips: सोमवारी बाजार मोठ्या चढउतारांदरम्यान वाढीसह बंद झाला. निफ्टी 21000 च्या आसपास बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 102.93 अंकांच्या अर्थात 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 69,928.53 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 27.70 अंकांनी म्हणजेच 0.13 टक्क्यांनी वाढून 20,997.10 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी सोमवारी एका सपाट नोटवर उघडला आणि एका रेंजमध्ये कंसोलिडेट होत राहिला आणि 20 अंकांच्या किंचित वाढीसह बंद झाल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. डेली चार्टनुसार निफ्टी 21000 च्या आसपास ट्रेडिंग करत आहे.

Share Market Investment Tips
Adani Group: गौतम अदानी आणखी एक कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत, 4100 कोटींची लावली बोली

एकूणच बाजाराचा कल पॉझिटीव्ह आहे. जर निफ्टी 20870-20850 पर्यंत घसरत असेल तर त्याचा वापर खरेदीची संधी म्हणून केला पाहिजे असे ते म्हणाले. गेल्या आठवड्यात दिसून आलेल्या मजबूत वाढीनंतर, बाजार आता स्थिर राहण्याची किंवा मंद गतीने वाढण्याची आशा आहे.

बँक निफ्टीतील वाढ कायम राहिली आणि तो किंचित वाढीसह बंद झाला. 47500 च्या आसपास विक्रीचा दबाव होता. पुढे बँक निफ्टीमध्येही कंसोलिडेशनची आशा आहे. कंसोलिडेशनची ही रेंज 46800 - 47500 असण्याची शक्यता आहे. एकूणच ट्रेंड पॉझिटीव्ह आहे.

Share Market Investment Tips
Sebi: शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवलेत? 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा 'हे' काम, अन्यथा...

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

  • अदानी एन्टरटेन्मेंट (ADANIENT)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • पॉलीकॅब (POLYCAB)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • पीएफसी (PFC)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()