Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

Share Market Investment Tips : गुरुवारी सेन्सेक्स-निफ्टी सलग पाचव्या दिवशी वाढीसह बंद झाले.
Share Market Investment Tips
Share Market Investment TipsSakal
Updated on

Share Market Investment Tips : गुरुवारी प्रचंड अस्थिरतेसह सेन्सेक्स-निफ्टी सलग पाचव्या दिवशी वाढीसह बंद झाले. गुरुवारी ऑटो, फार्मा, मेटल शेअर्समध्ये वाढ झाली. त्याचबरोबर आयटी आणि एफएमसीजी शेअर्सवर दबाव दिसून आला.

सेन्सेक्स 144 अंकांनी वाढून 59833 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 42 अंकांनी वाढून 17599 वर बंद झाला. निफ्टी बँक 42 अंकांनी वाढून 41041 वर बंद झाला. मिडकॅप्स 194 अंकांनी वाढून 30354 वर बंद झाले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टी फॉलिंग चॅनलच्या वर बंद होण्यात यशस्वी झाला आहे, जे एक सकारात्मक चिन्ह असल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. आवर्ली मोमेंटम इंडिकेटरवर नेगेटिव्ह डायव्हर्जंस दिसत आहे.

जे उच्च स्तरावर बाजारात दबाव वाढण्याचे संकेत देत आहे. गेल्या 5 दिवसात 700 अंकांच्या वाढीनंतर, बाजारात कंसोलिडेशनची शक्यता आहे.

बऱ्याच काळानंतर निफ्टीने 200 दिवसांच्या एसएमएची पुनरावृत्ती केल्यानंतर पुन्हा एकदा डेली आणि विकली चार्टवर बुलिश कँडल तयार केल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. आता निफ्टीला 17500-17375 वर सपोर्ट दिसत आहे.

तर, वरच्या बाजूस, 17700-17800 च्या झोनमध्ये त्याला रझिस्टंसचा सामना करावा लागेल. दरम्यान, बँक निफ्टीने विकली चार्टवरही बुलिश कँडल तयार केली आहे आणि 50-दिवसांच्या एसएमएवर ट्रेड करत आहे.

Share Market Investment Tips
Mutual funds : नवोपक्रमाशी संबंधित संधीचा लाभ

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • ऑरोफार्मा (AUROPHARMA)

  • ए यू बँक (AUBANK)

  • व्होल्टास (VOLTAS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Share Market Investment Tips
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.