Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

Share Market Investment Tips: बुधवारी सलग आठव्या दिवशी बाजारात तेजी होती.
Share Market Investment Tips
Share Market Investment TipsSakal
Updated on

Share Market Investment Tips : बुधवारी सलग आठव्या दिवशी बाजारात तेजी होती. सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद होण्यात यशस्वी झाले. मेटल, बँकिंग इंडेक्सही वाढीसह बंद झाले. मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

फार्मा, ऑटो शेअर्समध्ये खरेदी झाली. टीसीएसच्या निकालापूर्वी आयटी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. सेन्सेक्स 235 अंकांनी वाढून 60,393 वर बंद झाला. तर निफ्टी 90 अंकांनी वाढून 17,812 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी बँक 191 अंकांनी वाढून 41,558 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी सकारात्मक गतीने पुढे जात असल्याचे बीएनपी पारिबसचे जतिन गेडिया म्हणाले. निफ्टी सलग आठव्या ट्रेडिंग सत्रात वाढीसह बंद झाला. डेली चार्टवर, निफ्टी वरच्या बोलिंजर बँडसह वरच्या दिशेने जात आहे, जे एक सकारात्मक लक्षण मानले पाहिजे.

निफ्टी दिवसभर अस्थिर राहिला आणि मुख्यत: तेजीचा कल राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. डेली चार्टवर चॅनल ब्रेकआउटच्या वर इंडेक्स आहे. जे त्यात पॉझिटीव्ह रिव्हर्सल संकेत देत आहे.

डेली मोमेंटम इंडिकेटर आरएसआय बुलिश क्रॉसओव्हरमध्ये आहे आणि वर जात आहे. जोपर्यंत इंडेक्स 17,700 च्या वर टिकून राहील तोपर्यंत बाजार घसरणीच्या वेळी खरेदी होईल. वरच्या बाजूला ही रॅली 17,900/17,970 पर्यंत वाढू शकते.

Share Market Investment Tips
Google Layoffs: गुगलच्या कर्मचारी कपातीबाबत सुंदर पिचाई यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, कंपनी सध्या...

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • डिव्हीस लॅब (DIVISLAB)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • डॉ. रेड्डी (DRREDDY)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Share Market Investment Tips
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.