Share Market Investment Tips: शुक्रवारी बाजार सलग दुसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाला. जून सिरीजची चांगली सुरुवात झाली. हेवीवेट रिलायन्स आणि सर्व सेक्टर्समधील खरेदीमुळे निफ्टीने पाच महिन्यांतील उच्चांक गाठला.
व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 629.07 अंकांनी अर्थात 1.02 टक्क्यांनी वाढून 62501.69 वर आणि निफ्टी 178.10 अंकांनी म्हणजेच 0.97 टक्क्यांनी वाढून 18499.30 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती?
शुक्रवारी बाजारात तेजी दिसून आल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. जून सिरीजची सुरुवात सुमारे 1 टक्क्यांच्या मजबूत तेजीने झाली आहे.
एफएमसीजी, आयटी आणि रियल्टी सेक्टर्समधील खरेदीमुळे सर्वाधिक वाढ झाली. त्यामुळेच निफ्टी 18499.35 या दिवसाच्या उच्चांकावर बंद झाला.
शुक्रवारी कंसोलिडेशन दरम्यान इंडेक्स पॉझिटीव्ह होता. अमेरिकन बाजारातील रिकव्हरीमुळे आता आयटी क्षेत्रातही तेजी येत आहे. त्यामुळे बाजाराला चांगला सपोर्ट मिळाला.
याशिवाय रिलायन्ससारख्या दिग्गज कंपनीच्या मजबूत तेजीने बाजारात उत्साह संचारला. निफ्टीने 18400 ची पातळी ओलांडली असल्याने, त्यात लवकरच 18700 ची पातळी देखील पाहू शकतो.
आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?
रिलायन्स (RELIANCE)
सनफार्मा (SUNPHARMA)
हिन्दाल्को (HINDALCO)
हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
एचसीएल टेक (HCLTECH)
कमिन्स इंडिया (CUMMINSIND)
आयडीएफसी फर्स्ट (IDFCFIRSTB)
एम फॅसिस (MPHASIS)
झिंदाल स्टील (JINDALSTEL)
ऑरो फार्मा (AUROPHARMA)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.