मुंगी उडाली आकाशी...

शेअर बाजाराच्या घोडदौडीमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार गोंधळून गेला आहे. हा शेअर घेऊ का तो? तो विकू का हा? अशी त्याची स्थिती झाली आहे. या गोंधळलेल्या मनःस्थितीमुळे काही मूलभूतदृष्ट्या सक्षम असलेल्या शेअरकडे गुंतवणूकदारांचे लक्ष गेलेले नाही.
share market investors tata steel and steel authority of india
share market investors tata steel and steel authority of india Sakal
Updated on

शेअर बाजाराच्या घोडदौडीमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार गोंधळून गेला आहे. हा शेअर घेऊ का तो? तो विकू का हा? अशी त्याची स्थिती झाली आहे. या गोंधळलेल्या मनःस्थितीमुळे काही मूलभूतदृष्ट्या सक्षम असलेल्या शेअरकडे गुंतवणूकदारांचे लक्ष गेलेले नाही.

वर्तमानपत्रातूनदेखील अशा ‘मौल्यवान’ शेअरबद्दलचा ऊहापोह होत असतो. असे दोन शेअर म्हणजे टाटा स्टील आणि स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात सेल. कमी भाव असलेले परंतु, भरपूर उलाढाल असणारे आणि गेली तीन वर्षे सतत चांगला परतावा देणारे असे हे शेअर आहेत. बँकेतील किंवा वित्तसंस्थांतील मुदत ठेवींपेक्षा यांचा परतावा चांगला आहे. बँकेसारखीच मजबूत स्थिती या कंपन्यांची आहे. टाटा स्टीलला ‘टाटां’चा वरदहस्त आहे, तर ‘सेल’ला केंद्र सरकारचा!

टाटा स्टीलमध्ये कंपन्या विलीन

टाटा स्टीलमध्ये लोखंडी माल तयार करणाऱ्या किंवा तत्सम कारखाने काढणाऱ्या काही कंपन्या विलीन झाल्या आहेत. या कंपन्यांची वार्षिक उलाढाल १९,७०० कोटी रुपयांच्या आसपास आहे.

१. टाटा स्टील मायनिंग (वार्षिक उलाढाल ५,००० कोटी)

२. टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स (७,४६४ कोटी)

३. टिनप्लेट कंपनी (३,९८३ कोटी)

४. मेटॅलिक्स (३,२६० कोटी)

५. एस अँड टी मायनिंग (माहिती उपलब्ध नाही)

याशिवाय भुवनेश्वर पॉवर, अंगूल एनर्जी आणि इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्ट्स या कंपन्याही टाटा स्टीलमध्ये विलीन होणार आहेत, असे समजते.

स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडिया लि. (सेल)

सरकारच्या धोरणात बदल झाल्याचे या सरकारी कंपनीच्या कामगिरीवरून दिसून येते. ही कंपनी टाटा स्टीलपेक्षा काकणभर अधिक परतावा देत आहे.

सारांश

देशाच्या औद्योगिक भरभराटीत लोखंड आणि सिमेंट यांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. त्यांच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल इथल्याच खाणीतून भरपूर मिळत असल्याने आयात करावी लागत नाही. तंत्रज्ञान, मनुष्यबळ आणि दारी असणारी बाजारपेठ यामुळे या धंद्याला मरण नाही. शिवाय कमी किंमत आणि उत्तम परतावा देणारे हे दोन शेअर आखूड शिंगी, बहूदुधी आहेत. त्यामुळे या दोन कंपन्यांच्या शेअरमध्ये मध्यम किंवा बऱ्यापैकी गुंतवणूक करण्यास हरकत नाही.

कंपनीचे नाव- टाटा स्टील -सेल

बाजारभाव (८ फेब्रुवारी) -रु. १४५- १४३

५२ आठवड्यांचा उच्चांक -रु. १४७- १५०

मूळ किंमत- १- रु. १०

परतावा (टक्के)

६ महिने- २३ -५४

१ वर्ष -३०- ६९

३ वर्ष- १०६- १११

पीई -२०.७१- १८.४३

वार्षिक उलाढाल (कोटी रुपये) -२,४४,३९० -१,०४,४४७

निव्वळ नफा (कोटी रुपये)- ७,६५७- १,५३०

भागभांडवल (कोटी रुपये)- १,२२१ -४,१३०

गंगाजळी (कोटी रुपये) -१,०१,८६० -५०,६१६

किती पट (भागभांडवलाच्या)- ८३ -१२

शेवटचा बोनस शेअर - जून २००४ -नाही

प्रमाण १:२

(डिस्क्लेमर : शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते.

त्यामुळे वाचकांनी गुंतवणुकीबाबतचा निर्णय स्वत:च्या

जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.