Share Market Closing: शेअर बाजारातील घसरण वाढली; सेन्सेक्स 662 अंकांनी घसरला, बँक निफ्टी 1000 अंकांनी कोसळला

Share Market Closing Today: बाजारात विक्रीचा दबाव कायम राहिला आणि सेन्सेक्स-निफ्टी सलग पाचव्या दिवशी घसरला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात जोरदार विक्री झाली.
Share Market
Share Market Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 25 October 2024: देशांतर्गत शेअर बाजारात आठवड्याचा शेवट घसरणीसह झाला. या महिन्यात बाजारात सतत घसरण होत आहे आणि या आठवड्यात सेन्सेक्स-निफ्टी 2-3% ने घसरला आहे. आज शुक्रवारी (25 ऑक्टोबर) दिवसभर व्यवसायात चढ-उतार होत होते.

मात्र, शेवटच्या तासात निर्देशांक किंचित सावरताना दिसत होते, परंतु असे असतानाही बाजार घसरणीसह बंद झाला. निफ्टी 218 अंकांनी घसरून 24,180 वर बंद झाला. सेन्सेक्स 662 अंकांनी घसरून 76,402 वर आणि निफ्टी बँक 743 अंकांनी घसरून 50,787 वर बंद झाला.

Share Market Today
Share Market ClosingSakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.